Mumbai Sakal
मुंबई

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवरील चुकीचे आरोप थांबवावे : रामदास आठवले

पत्नी सीमाताई आठवले,रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; सुरेश बारशिंग आदी उपस्थित होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना रिपब्लिकन पक्षाने जाहीर पाठिंबा दिला. वानखेडे परिवाराच्या पाठीशी एकमेव केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले ठामपणे उभे राहिल्याबद्दल समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज संविधान निवासस्थानी येऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन यांचे आभार मानले.तसेच ज्ञानदेव वानखेडे यांनी ते हिंदू दलित पूर्वाश्रमीचे हिंदू महार असल्याचे सर्व पुरावे रामदास आठवले यांच्या कडे सोपविले. यावेळी रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले,रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; सुरेश बारशिंग आदी उपस्थित होते.

मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे या दलित मात्र कर्तबगार अधिकाऱ्यावर चुकीचे आरोप करीत आहेत. त्यांच्या जावयावर कारवाई केल्यामुळे नवाब मलिक समीर वानखेडेंवर चुकीचे आरोप करीत आहेत. असे खोटे आरोप करणे त्यांनी थांबवावे. ड्रग्स रोखण्याचे काम समीर वानखेडे करीत आहेत. क्रूझवर केलेली कारवाई योग्य आहे.मात्र ड्रग्स पार्टी रोखण्याचे काम करणाऱ्या समीर वानखेडे यांच्या खाजगी आयुष्याची जाहीर चर्चा करून आरोपबाजी करणे अत्यंत चुकीचे आहे. ते नवाब मलिक यांनी थांबवावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ज्ञानदेव वानखेडे यांनी आपण हिंदू महार असल्याचे पुरावे म्हणुन त्यांची वंशावळ;गावचे; कॉलेज चे; सर्व्हिस बुक ; पासपोर्ट आदी पुरावे सादर केले. आमच्या संकटकाळात एका प्रामाणिक दलित अधिकाऱ्याच्या कुटुंबाचे खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणून खोडसाळ आरोप मलिक आमच्यावर करीत आहेत. मी कधीही धर्मांतर करून इस्लाम स्वीकारला नाही. आम्ही हिंदू मुस्लिम सर्व धर्मांचा आदर करतो.माझा विवाह मुस्लिम महिलेशी झाला आहे.पण मी हिंदू महार आहे.

आंबेडकरी अनुयायी आहे.जय भीम वाला आहे. आमच्या पाठीशी रामदास आठवले ठामपणे उभे राहिल्याचा मला माझ्या जातीबद्दल अभिमान आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही नोकरीला लागलो. आम्हाला आमचे नेते रामदास आठवले यांचा मजबूत पाठिंबा मिळाल्या मुळे आम्ही नवाब मलिक यांना घाबरणार नाही. त्यांनी कोर्टात जावे मात्र आमच्या खाजगी आयुष्याबाबत जाहीर आरोप करण्याचे अधिकार नवाब मलिक यांना कोणी दिले. मंत्री पदाची शपथ घेताना त्यांनी कुणाचे खाजगी आयुष्य जाहीर करण्याची शपथ घेतली का? असा सवाल क्रांती रेडकर आणि ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदाचा गैरफायदा घेऊन एका दलित अधिकाऱ्यावर चुकीचे आरोप केले आहेत.समीर वानखेडे यांच्या केसाला ही धक्का लागू देणार नाही. आरपीआय त्यांच्या पाठीशी आहे.

वानखेडे यांच्या परिवाराला ही धमक्या येत आहेत.मुख्यमंत्र्यांनी क्रांती रेडकर यांच्या कुटुंबाला वेळ देऊन भेटले पाहिजे असे ना रामदास आठवले म्हणाले.वानखेडे हे दलित असून त्यांनी कोणत्याही दलितांचा हक्क हिरावलेला नाही असे रामदास आठवले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonavala Traffic : लोणावळ्यात २२० वाहनांवर कारवाई; एक लाख ८२ हजारांचा दंड वसूल

MPSC: ‘एमपीएससी’त अपात्र ठरलेल्या खेळाडूंना दिलासा; छत्रपती संभाजीनगर, निवडप्रक्रियेसाठी पात्र ठरविण्याचे मॅटचे आदेश

Supriya Sule : महायुती सरकारने दिवाळखोरीकडे वाटचाल केली; खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

लवकर सुधारणा करा! मुख्यमंत्र्यांची नगर विकास खात्याच्या कामावर नाराजी, फडणवीस अन् शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल?

Teacher Transfer: ऑनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांची डोकेदुखी; संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरण्याची टांगती तलवार, समायोजनाचाही प्रश्न

SCROLL FOR NEXT