मुंबई

'बडी जीत का..', ईडी कोठडीत वाढ झाल्यानंतर नवाब मलिक यांचे ट्विट

सकाळ डिजिटल टीम

नवाब मलिक यांना पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ केली आहे.

मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. आज झालेल्या सुनावणीवेळी त्यांच्या ईडी (ED) कोठडीत आणखी वाढ करण्यात आली. आज त्यांची कोठडी संपणार होती, त्यामुळे नवाब मलिक यांना पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ केली आहे. यानंतर नवाब मलिक यांच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आलं आहे. 'बड़ी जीत का बड़ा शोर होगा तुम्हारा सिर्फ वक़्त है, हमारा दौर होगा' असं म्हणत नवाब मलिक यांनी एक इशाराच दिला असल्याची चर्चा आता सुरु आहे.

नवाब मलिक यांनी हसीना पारकरला (Haseena Parkar) ५५ लाख रुपये दिल्याचे ईडीने म्हटले होते. मात्र, आता ईडीने न्यायालयात त्यांची चूक मान्य करताना मलिकांनी ५ लाख रुपये दिल्याचे म्हटलं आहे. आमच्या टायपिंगमध्ये चूक झाल्याचं कारण ईडीने सांगितले आहे. २५ ते २८ मार्च या काळात मलिक हे वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात होते. त्यामुळे नवाब मलिकांची कोठडी वाढवून द्यावी, असा युक्तीवाद ईडीतर्फे करण्यात आला. त्यानुसार न्यायालयानं मलिकांच्या कोठडीत वाढ केली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यानंतर ईडीने अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसंच इतर काहींची चौकशी केली होती. यात आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर ईडीने २३ फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांच्या घरी छापा टाकला होता. तेव्हा ८ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT