Nawab Malik News Updates e sakal
मुंबई

'हम वोह है जहा मुश्किलें...', कोर्टाने निर्णय देताच मलिकांचं ट्वीट

सकाळ डिजिटल टीम

सक्तवसुली संचलनालयाने कारवाई केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. नवाब मलिकांच्या घरांवरील छाप्यांनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत.

दरम्यान मलिक यांच्या वकिलांनी संबंधित कारवाई जाणूनबूजून सुरू असल्याचा आरोप केला. याविरोधात कार्टात धावही घेतली. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत मलिकांना दिलासा देण्यास नकार दिला. यानंतर मलिक यांच्या वतीने ट्वीट करण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू आहे.

ईडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना दणका दिला आहे. मलिक यांनी ईडीवर आरोप करत संबंधित कारवाई सूडबुद्धीने केल्याचं म्हटलं होतं. ज्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली, त्या वेळी संबंधित कायदाच तयार झालेला नव्हता, असं मलिक यांचे वकील म्हणाले. (Bombay High Court Rejects Habeas Corpus plea of Nawab Malik)

संबंधित प्रकरणात मलिकांना चौकशीसाठी बोलावून त्यांच्याकडून माहिती घेता येऊ शकते. मात्र, तरीही मलिकांना कोठडी देण्यात आली, असं वकिलांनी म्हटलं. मात्र, नवाब मलिकांचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता मलिक पीएमलए कोर्टात जाऊन जामीन मागण्यची शक्यता आहे.

न्यायालयाने दणका दिल्यानंतर मलिका यांच्या कार्यालयाच्या वतीने ट्वीट करण्यात आलंय.

रुकावटे है ज़रूर पर हौसले ज़िंदा है हम वोह है जहा मुश्किलें शर्मिंदा है

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Immigration Policy : ट्रम्प यांची भूमिका अचानक बदलली! स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याचे धोरण कठोर असल्याची कबुली; भारत-पाकिस्तान अणुयुद्धाबाबतही पुन्हा मोठा दावा

Microsoft AI Policy : ६० हजार कर्मचाऱ्यांसमोर स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव, त्यातच मायक्रोसॉफ्टच्या धोरणांवर टीका; एआयमुळे नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी त्रस्त?

Latest Marathi News Live Update : वाशिम जिनिंगमध्ये उघड्यावर साठवून ठेवलेल्या दहा हजार क्विंटल कापसाला आग

Flight Hijack Scare : विमानाचे उड्डाण होणार इतक्यात टॉयलेटच्या आरशावर दिसला 'तो' मेसेज; १०५ प्रवाशांचा जीव टांगणीला!

China Economic Crisis : चीनच्या अर्थव्यवस्थेची दोन टोके; तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती, मात्र बेरोजगारी आणि घसरत्या गुंतवणुकीमुळे आर्थिक आव्हाने कायम

SCROLL FOR NEXT