Sushant Singh Rajput  
मुंबई

सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात एकाला अटक

वांद्रायातून हरीश खानला अटक करण्यात आली.

दीनानाथ परब

मुंबई: अमली पदार्थ विरोधी शाखेने (NCB) हॅरिस खान (Harish Khan) नावाच्या ड्रग पेडलरला अटक केली आहे. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात (Sushant Singh Rajput case)ही अटक झाली आहे. वांद्रयातून हॅरीस खानला अटक करण्यात आली. त्याचबरोबर साकीब खानलाही अटक करण्यात आली आहे. हे दोघेही फरार आरोपी होते.(NCB arrested Harish Khan in late Bollywood actor Sushant Singh Rajput case)

हॅरीस खान परवेझ खान उर्फ चिंकू पठानच्या संपर्कात होता. चिंकू पठान दाऊद इब्राहिमचा साथीदार आहे. अंधेरी लोखंडवाला आणि वांद्रे येथे छापे मारीच्या कारवाई दरम्यान हॅरीस खानला अटक करण्यात आली. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ड्रग्ज प्रकरणात हॅरीस खानची काय भूमिका होती? त्याचा सुद्धा NCB तपास करणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ड्रग्ज पेडलर आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचं काय कनेक्शन आहे? त्याचा NCB कडून तपास सुरु आहे. मागच्यावर्षी जून महिन्यात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हे सर्व समोर आलं. वांद्रयाच्या पॉश वसाहतीत राहणारा सुशांत मागच्यावर्षी १४ जून २०२० रोजी फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. मागच्या आठवड्यात NCB ने सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला हैदराबादमधून अटक केली होती. रविवारी एनसीबीने सुशांतच्या घरी काम करणाऱ्या नीरज आणि केशव या दोघांचीही चौकशी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT