kranti redkar and cm 
मुंबई

शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला- क्रांती रेडकर

क्रांतीचं मुख्यमंत्र्यांना पत्र

स्वाती वेमूल

क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात आर्यन खानच्या अटकेनंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होत असलेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. 'एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा,' अशी विनंती क्रांतीने या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

क्रांती रेडकरचं पत्र-

'माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेव ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे, लढते आहे. सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत.

मी एक कलाकार आहे. राजनीती मला कळत नाही आणि मला त्यात पडायचंसुद्धा नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चारचौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे.

आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खासगी हल्ले हे राजकारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आज ते नाही पण तुम्ही आहात. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा,' अशी विनंती क्रांतीने पत्राद्वारे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप करत आहेत. क्रुझवरील पार्टीत सहभागी असलेला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया हा समीर वानखेडे यांचा मित्र असल्याचा आरोप मलिकांनी केला. तसंच वानखेडे यांचा पहिला विवाह मुस्लीम पद्धतीने झाल्याचे प्रमाणपत्र मलिक यांनी सादर केला. समीर वानखेडे व त्यांच्या वडिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले. आई मुस्लीम होती व तिच्या शब्दाखातर आपण मुस्लीम पद्धतीने विवाह केला होता, असं वानखेडेंनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT