मुंबई

NCB ने हस्तगत केलेत अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाचे चॅट्स; चॅट्समधून धक्कादायक माहिती उघड

सुमित बागुल

मुंबई : अर्जुन रामपालची गेर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ अगिसियाओस डेमेट्रिएड्स हा लॉकडाऊन काळापासूनच मुंबईत ड्रग्सचं रॅकेट चालवत असल्याची मोठी बातमी समोर येतेय. NCB म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधील सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. ड्रग्स कनेक्शन प्रकरणी NCB च्या अधिकाऱ्यांनी गॅब्रिएलाच्या भावाचा मोबाईल जप्त केला होता. त्याच्या मोबाईलमधील WhatsApp चॅट्सचा जुना डेटा शोधून काढण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. या चॅट्समधून गॅब्रिएलाच्या भावाने म्हणजेच अगिसियाओस डेमेट्रिएड्सने एका मोठ्या सेलिब्रिटीच्या मदतीनं बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं जाळं पसरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

NCB अधिकाऱ्यांनी अगिसियाओस डेमेट्रिएड्सचा मोबाईल जप्त करून फॉरेन्सिकमध्ये पाठवला होता. यानंतर अगिसियाओसचे चॅट्स NCB समोर आले आहेत. या WhatsApp चॅट्सच्या माध्यमातून अगिसियाओस डेमेट्रिएड्सचा हा परदेशात मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करी करणार होता अशी माहिती समोर येतेय. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या माहितीनुसार अगिसियाओस हा परदेशातील काही बड्या ड्रग्स तस्करांच्या संपर्कात होता ही देखील माहिती समोर येतेय. साऊथ आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन आणि कोलंबिया मधील काही पेडलर्स त्याच्या संपर्कात होते. तसेच परदेशातून ड्रग्स मागवून अगिसियाओस भारतात ड्रग्स कमी किमतीत विकत होता. 

कोण आहे अगिसियाओस डेमेट्रिएड्स ? 

अगिसियाओस डेमेट्रिएड्स हा अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ. अगिसियाओस डेमेट्रिएड्स हा मूळचा साऊथ आफ्रिकेचा रहिवाशी आहे. पर्यटक व्हिजावर अगिसियाओस डेमेट्रिएड्स भारत आला होता. अगिसियाओस डेमेट्रिएड्स हा सध्या जामिनावर जेलबाहेर आहे. 

NCB retrieve whatsapp chats of Agisilaos demetriades and gets important information

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT