Sameer Wankhede 
मुंबई

प्रसिद्धी नियमांचं उल्लंघन करण्याचा अधिकार देते का? - समीर वानखेडे

"आम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य करतो, असं अनेकदा म्हटलं गेलंय. पण आम्ही फक्त आमचं काम करतोय"

स्वाती वेमूल

प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यनसह Aryan Khan आठ तणांना रविवारी अटक केली. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने ही कारवाई केली. या कारवाईनंतर एकीकडे एनसीबीचं कौतुक होत आहे तर दुसरीकडे ते बॉलिवूडला लक्ष्य करत असल्याची टीका होत आहे. याबद्दल खुद्द समीर वानखेडे Sameer Wankhede यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे. "आम्ही बॉलिवूडला लक्ष्य करतो, असं अनेकदा म्हटलं गेलंय. परंतु त्याविषयी न बोलता आपण तथ्य आणि आकडेवारीविषयी बोलुयात. गेल्या वर्षी आम्ही १० महिन्यांत एकूण १०५ गुन्हे नोंदवली आहेत. दर महिन्याला सरासरी १०-१२ प्रकरणे समोर आली आहेत. आता तुम्ही मला सांगा, त्या १०५ प्रकरणांपैकी किती सेलिब्रिटी आहेत? अगदी मूठभर आहेत असं मी सांगेन," असं वानखेडे म्हणाले.

"या वर्षभरात ३१० हून अधिक जणांना अटक"

कारवाईबद्दलची माहिती देत ते पुढे म्हणाले, "या वर्षभरात आम्ही ३१० हून अधिक जणांना अटक केली आहे. त्यापैकी किती जण सेलिब्रिटी आहेत? या वर्षी आम्ही १५० कोटी रुपयांहून अधिक अवैध पदार्थ जप्त केले आहेत. त्याबद्दल कोणी बोलतंय का? आज माध्यमांमध्ये आर्यन खानची स्टोरी दाखवली जातेय. पण दोन दिवसांपूर्वीच आम्ही ५ कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं होतं. गेल्या आठवड्यात आम्ही अंडरवर्ल्डशी संबंधित सहा कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं होतं. त्याबद्दल का बोललं जात नाही? नायजेरिया ड्रग्ज प्रकरण हाताळताना माझ्या एका कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्याबद्दल बॉलिवूडमधून किंवा माध्यमांमधून बोललं जात नाही. आमच्या कामाबद्दल स्तुती करण्यापेक्षा उलट आमच्यावर टीका केली जात आहे की आम्ही लोकप्रिय सेलिब्रिटींना लक्ष्य करतो."

"सर्वांसाठी नियम सारखेच"

"आम्ही फक्त आमचं काम करतोय. प्रत्येकासाठी नियम सारखेच आहेत. मग जे सेलिब्रिटी त्या नियमांचं पालन करत नाहीत त्यांना आम्ही मोकळे का सोडू? फक्त ते प्रसिद्ध आहेत म्हणून का? प्रसिद्धी त्यांना नियमांचं उल्लंघन करण्याचा अधिकार देते का? जर आपण एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला कायदा मोडताना पाहिलं तर आपण त्याबद्दल काही करू नये का? मी फक्त ड्रग तस्कऱ्यांच्या मागे पळावं आणि फक्त झोपडपट्टीतच छापे टाकावेत, असं होऊ शकत नाही. जेव्हा आम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळते आणि मला कायद्याचं उल्लंघन होताना दिसेल, तेव्हा मी त्यावर कारवाई करेन. मी मोठ्या आणि प्रसिद्ध लोकांच्या दबावाला बळी पडावं असं तुम्हाला वाटतं का? मी श्रीमंत लोकांच्या सामर्थ्याला बळी पडावं का? मी तसं केलं तर देशातील जनता खूश होईल का?", असा सवाल वानखेडे यांनी या मुलाखतीत केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram: ''राजेंद्र प्रसाद यांनी मोठी चूक केलेली'', वंदे मातरम् बिल मंजूर झाल्यानंतर खासदार ओवैसींचं वादग्रस्त विधान

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT