sameer wankhede 
मुंबई

Aryan Drugs Case: 'सत्यमेव जयते!'; समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

विशेष न्यायालयाने आर्यन खानसोबत अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांचा जामीन फेटाळला.

स्वाती वेमूल

विशेष न्यायालयाने आर्यन खानसोबत अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांचा जामीन फेटाळला.

Aryan Khan Drugs Case: क्रुझवरील अमलीपदार्थ प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांचाही जामीन फेटाळण्यात आला. एनसीबीने जामीन अर्जाला तीव्र विरोध केला होता. न्यायालयाच्या निकालानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सत्यमेव जयते' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र या प्रकरणावर पुढे काही बोलण्यात त्यांनी नकार दिला. 'इंडिया टुडे'नं हे वृत्त दिलं आहे.

आर्यन मागील 17 दिवसांपासून कारागृहात आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना त्याच्याकडे ड्रग्ज सापडले नाहीत, केवळ व्हॉटसप चॅटच्या आधारावर त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत, असा युक्तिवाद आर्यनच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे यांनी केला होता. तर एनसीबीच्या वतीने जामिनाला तीव्र विरोध करण्यात आला होता. आर्यन प्रभावशाली कुटुंबातील आहे आणि त्याला जामीन मंजूर झाला तर तपासात बाधा येऊ शकते, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. तसेच आर्यनकडे काही सापडले नसले तरी त्याला अमली पदार्थ घ्यायचे होते आणि तो आंतरराष्ट्रीय तस्करांच्या संपर्कात होता असे गंभीर आरोप केले आहेत.

विशेष न्या. व्ही व्ही पाटील यांनी आज (बुधवारी) या जामिन अर्जावर निकाल जाहीर केला. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. न्या. पाटील यांनी एनसीबीचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन नामंजूर केला. त्यामुळे उच्च न्यायालयात आता जामिन अर्ज करण्यात येईल असे त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT