Pravin Darekar sakal
मुंबई

मनीष भानुशालीचा भाजपाशी काय संबंध? प्रवीण दरेकरांनी दिलं उत्तर

शाहरुखचा मुलगा आर्यनसोबत मनीषचा फोटो आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपावर गंभीर आरोप केलाय.

दीनानाथ परब

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात NCB ने क्रूझवर केलेल्या छापेमारीच्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शाहरुखच्या मुलासोत एका व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला होता. या व्यक्तीचे नाव मनीष भानुशाली (manish bhanushali) असून तो भाजपाशी (Bjp) संबंधित असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे.

"मनीष भानुशालीबद्दल माहिती नाही. मला कल्पना नाही. एनसीबी कार्यालय खुलासा करेल. कोणाला पाठिशी घालायचं कारण नाही. नवाब मलिक यांच्यावर जावयावर झालेली कारवाई अजून त्यांच्या पचनी पडलेली नाही. तो पोटशूळ त्यांच्या वक्तव्यातून दिसतोय" असे प्रवीण दरेकर म्हणाले.

"असं कधीच या देशात झालेलं नाही. सीबीआयची कारवाई झाली की सीबीआय, ईडीवर बोलायचं आता एनसीबीची कारवाई झाल्यावर तसंच चित्र उभ करायचा प्रयत्न होतोय" असे दरेकर म्हणाले. मनीष भानुशालीला भेटल्याचं मला तरी आठवत नाही, असे दरेकरांनी सांगितलं.

"नवाब मलिका बोलत असतील तर चौकशी होईल. एनसीबीची कारवाई सुरु झालेली असताना अंतिम निर्णय द्यायला, नवाब मलिक फायनल ऑथोरिटी नाहीत" असे दरेकर म्हणाले. मनीष भानुशालींचे पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही काही फोटो समोर आलेत. त्यावर दरेकर म्हणाले की, "आता फोटो दाखवताय. खरे आहेत किंवा काय, डिजिटलायझेशन खूप आहे. आम्ही सार्वजनिक कार्यक्रमाला जात असतो. त्यावेळी अनेक जण भेटतात. प्रत्येक फोटो चेक करत नाही म्हणून एनसीबी पक्षपाती आहे असं बोलू नये. अनेक प्लॅटफॉर्म आहेत. तिथे न्याय मागू शकतो"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT