मुंबई

जेंव्हा शरद पवार सकाळी सकाळीच जातात संजय राऊतांच्या घरी

सुमित बागुल

मुंबई : शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर नुकतीच दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी सर्जरी पार पडली. मुंबईतील लीलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्यावर ही सर्जरी पार पडली आहे. सर्जरीनंतर संजय राऊत यांना डॉक्टरांच्या निगराणीत ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर राऊत यांना डिस्चार्ज देण्यात आला.

राऊत यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे संजय राऊतांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी गायक आनंद शिंदे हे देखील संजय राऊतांच्या भेटीसाठी गेले होते. शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे यांनी संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली. 

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र आता त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्यानं डॉक्टरांनी परत अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला दिला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल 2020 ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.  

दरम्यान, आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांनी संजय राऊत यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.     

NCP chief sharad pawar meets sanjay raut along with ajit pawar and dhanjay munde 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

Chandu Chauhan : ‘सर्जिकल स्ट्राइक’मधील वादग्रस्त चंदू चव्हाण अटकेत; पोलिसांवर गंभीर आरोप

Latest Marathi News Updates : खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांचं 'बंदूक फोटोशूट', ‘शो ऑफ’ चांगलंच अंगलट आलं, गुन्हा दाखल

पाय फ्रॅक्चर झाल्यावरही नृत्याच्या कार्यक्रमासाठी जिद्दीने उभी राहिली अभिनेत्री; "फक्त मनात ठरवता.."

SCROLL FOR NEXT