rupali chakanakar  
मुंबई

"56 इंच छाती दाखवण्याची हीच वेळ"; राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांचा मोदींना टोला..  

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: चीनच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नसल्यास त्या भेकड कृत्याचा सूड घेण्याची हीच वेळ आहे, 56 इंच छाती दाखविण्याची हीच वेळ आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. 

लडाख मधील गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतानाच या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रीमती चाकणकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचवेळी स्वदेशीचा नारा देत त्याच्या विसंग वर्तन करणाऱ्या पंतप्रधानांच्या कृतीवरही त्यांनी टीका केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 पासून चीनला 18 वेळा म्हणजे सरासरी वर्षाला तीनवेळा जावून आले आहेत. इतक्या चकरा मारुन त्यांनी काय मिळवले, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. एकीकडे आत्मनिर्भर भारत या मुद्याला पुढे करताना 'व्होकल फॉर लोकल'ची संकल्पना पंतप्रधान मोदी जनतेसमोर मांडत आहेत. तरीही काही दिवसांपूर्वी दिल्ली- मेरठ मेट्रोच्या कामात एलअँडटी या भारतीय कंपनीला डावलून चीनच्या 'शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनीला हे काम का दिले, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. 

असे असेल तर स्वदेशीचा नारा का देण्यात येत आहे. एकीकडे प्रसारमाध्यमांना हाताशी धरून चीनविरोधात भारतीयांच्या भावना  चेतवण्यासाठी चिनी मालावर बहिष्काराचे आवाहन भाजप नेते करीत आहेत. तर दुसरीकडे चिनी कंपन्यांनाच भारतातील मोठमोठी कामे द्यायची ही देशाची फसवणुक आहे, असेही त्यांनी दाखवून दिले आहे. 

कोणावरही स्वतःहून हल्ला न करण्याची भारताची परंपरा असली तरी कोणी हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर देण्याची धमक भारतात आहे. हे दाखवून चीनच्या कृत्याला उत्तर देण्याची वेळ आली आहे, असेही चाकणकर यांनी मोदी यांना सांगितले आहे.

NCP criticizes narendra modi on china issue

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT