समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील फोटो Nawab malik twitter
मुंबई

"फोटो पाठवणाऱ्याच्या इच्छेनुसार, वानखेडेंच्या लग्नाचा फोटो सार्वजनिक केला"

"मला रात्री दोन वाजता फोटो पाठवला. ज्याने फोटो पाठवला त्याने फोटो सार्वजनिक करण्याची इच्छा व्यक्त केली""

दीनानाथ परब

मुंबई: "आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (aryan khan drug case) घटनाक्रम वेगाने बदलला आहे, पकडणार बचावाचा मार्ग शोधत आहे. पकडून घेऊन जाणारे आता तुरुंगात आहेत. म्हणन मी काल 'पिक्चर अभा बाकी हैं मेरे दोस्त' असं म्हटलं" असं नवाब मलिक (nawab malik) आज पत्रकार परिषदेत म्हणाले.

"या प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. वानखेडेंनी सर्व युक्त्या करुन पाहिल्या. माझ्या कुटुंबीयांना यात ओढलं जात आहे" असे ते म्हणाले. मी कधीही त्यांच्या स्वर्गवासी आईचं नाव घेतलं नाही असे नवाब मलिक म्हणाले.

"मी जो जन्मदाखला टाकला होता. त्यावर दाऊद वानखेडे त्यांच्या वडिलांचं नाव होतं. मी तेवढचं म्हटलं होतं. मी त्यांच्या बहिणीवर मुद्दामून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. फ्लेचर पटेल, लेडी डॉन म्हटल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या" असे नवाब मलिक म्हणाले. "पहिल्या पत्नीचा फोटो टाकला. त्यावेळी लोकांनी मला विचारलं. हा फोटो का टाकला? मला रात्री दोन वाजता फोटो पाठवला. ज्याने फोटो पाठवला त्याने फोटो सार्वजनिक करण्याची इच्छा व्यक्त केली" असे नवाब मलिक यांनी सांगितले.

"त्यांची दुसरी पत्नी म्हणजे क्रांती रेडकरचे नाव मी कधीही घेतलं नाही, किंवा टिप्पणी केली नाही, असे नवाब मलिक म्हणाले. माझी लढाई कोणाचं कुटुंब किंवा धर्मासोबत नाही. माझी लढाई अन्यायाविरोधात आहे" असे नवाब मलिक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT