मुंबई

‘सुधारतील असे वाटले होते पण, गणेश नाईक पुन्हा चुकले’

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबई : मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे निवडून येतील हे कुणालच वाटले नव्हते; मात्र त्यांनी गणेश नाईकांचा अनपेक्षित पराभव केला. नाईकांच्या चुकांमुळे लोकांनी त्यांना नाकरले. पाच वर्षांत ते आपल्या चुका सुधारतील असे वाटले होते; मात्र आता नाईक पुन्हा दुसऱ्यांदा चुकले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईत केली.

पळपुट्यांची चिंता करू नका
माजी मंत्री गणेश नाईक भाजपवासी झाल्यानंतर नवी मुंबईत गणपतशेठ तांडेल मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या वेळी पवार म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांचे काम रोजगार निर्मितीचे असते; मात्र विद्यमान सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी हातांचे काम हिसकावून घेतले आहे. त्यामुळे हा काळ संघर्षाचा आहे. तो टाळण्याऐवजी अनेक जण स्वतःच्या स्वर्थासाठी सत्तेच्या पडद्याआड लपण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या पळपुट्यांची अजिबात चिंता करू नका. जनता त्यांना धडा शिकवणार आहे.’

जनता स्वाभिमानी
माझ्या ५२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी २७ वर्षे सत्तेच्या बाहेर होतो, पण काम करताना कधीच अडचण आली नाही, असे पवार म्हणाले. ते म्हणाले, ‘विरोधात असतानाही चांगली कामे करता आली. सरकारला सध्या अनेक आघाड्यांवर अपयश आले आहे. चुकीच्या निर्णयांमुळे देशाच्या इतिहासात सर्वांत मोठी मंदीची लाट आली आहे. मूठभर लोकांचे भले करण्यासाठी कोट्यवधी लोकांचे रोजगार हिसकावून घेतला आहे. त्याविरोधात संघर्ष करण्याऐवजी काहींनी पळ काढला आहे; मात्र त्यांचा कोणाताही विचार करण्याची गरज नाही. कारण महाराष्ट्र हे स्वाभिमानी लोकांचे राज्य आहे. आपली माणसे स्वाभिमानाशी तडजोड करत नाहीत, त्यामुळे पळपुट्यांची अवस्था वाईट होणार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kukadi Project : ‘कुकडी’त उच्चांकी ९३ टक्के पाणीसाठा; प्रकल्पातील धरणे भरल्याने रब्बी हंगामाची मिटली चिंता

Manchar News : उसनवारीच्या धान्यावर भूक भागविण्याची वेळ; आंबेगाव तालुक्यात २२ शाळांचा पुरवठा रखडला

Power Shake-Up in Shirur: शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी गटाला तडे; शरद पवार गटाचे पाच नगरसेवक बाहेर पडल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता

PNG Connection : चार लाख सदनिकांना महिनाभरात ‘पीएनजी’ जोडणी अनिवार्य

Rural Heart Attack Care : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील तातडीच्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचाराने शेतकऱ्याचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT