Nawab Malik 
मुंबई

हा भेदभाव नाही दिसत का? नवाब मलिकांची संतप्त प्रतिक्रिया

तौक्ते वादळाने गेल्या तीन-चार दिवसात किनारपट्टीच्या राज्यांना झोडपून काढलं

विराज भागवत

तौक्ते वादळाने गेल्या तीन-चार दिवसात किनारपट्टीच्या राज्यांना झोडपून काढलं

मुंबई: तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) सोमवारी महाराष्ट्राला (Maharashtra) झोडपल्यानंतर मंगळवारी गुजरातच्या (Gujarat) किनारपट्टीवर थैमान घातलं. तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये प्रचंड नुकसान झाले. वादळामुळे राज्यात सात जणांचा मृत्यू झाला. वादळाने सौराष्ट्र, दीव आणि दमणसह अनेक भागांमध्ये नुकसान केलं. वादळी (Windy weather) वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाले. वीजपुरवठा (Power cut) खंडित झाला. गुजरातसारखीच परिस्थिती इतर राज्यांमध्ये झाल्याचे चित्र आहे. पण असे असताना पंतप्रधान मोदी केवळ गुजरातमधील काही बाधित भागांची हवाई मार्गाने पाहणी (Ariel Survey) करणार आहेत. ही गोष्ट विरोधकांना रूचलेली नाही. राज्याचे मंत्री व राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (NCP Nawab Malik Angry on Pm Modi Only Gujarat Ariel Tour of Cyclone Tauktae damage)

महाराष्ट्रातही तौक्ते वादळ आले होते. मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. "आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात तौक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे. मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत? हा स्पष्टपणे होत असलेला भेदभाव दिसत नाही का?", असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी ट्वीट करत उपस्थित केला.

संजय राऊत काय म्हणाले...

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ गुजरातमधील नुकसानीची पाहणाी करणार आहेत असं समजलं. कदाचित त्यांना वाटत असावं की महाराष्ट्राचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व संकटांशी सामना करण्यासाठी समर्थ आहे. सर्व संकटांशी सामना करणारे नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे अशी पंतप्रधानांना खात्री पटली आहे असं वाटतंय. गुजरातमध्ये (भाजपचं) सरकार कमकुवत आहे. त्यामुळे त्यांनी फक्त तिथलाच दौरा करण्याचे निश्चित केले असावे", अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याचा समाचार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VVMC Election: मनसे-बविआ युतीमुळे गणित बदललं; उद्धव ठाकरे एकटेच लढणार? ११५ जागांची लढाई रंगणार

Shocking : क्रिकेटच्या सामन्यापूर्वी प्रशिक्षकाचा मृत्यू; खेळाडू मैदानावर उतरणारच होते, तितक्यात घडला धक्कादायक प्रकार

BMC Election: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची बीएमसी निवडणुकीत एन्ट्री? दोन्ही मुलींकडून वडिलांसोबत अर्ज दाखल; कोणत्या जागेवरून लढणार?

Marathi Weekly Tarot Horoscope: लक्ष्मी योगामुळे वृषभ, मिथुन, कर्कसह 5 राशींना मिळणार मोठा आर्थिक लाभ; वाचा साप्ताहिक टॅरो राशिभविष्य

Stock Market Holiday : NSE कडून 2026 साठी सुट्ट्यांची यादी जाहीर; 15 दिवस शेअर बाजार बंद! 1 जानेवारीला बाजार सुरू राहणार?

SCROLL FOR NEXT