मुंबई

टायमिंग साधत राष्ट्रवादीचा भाजपाला खोचक टोला, म्हणाले..   

सकाळवृत्तसेवा

मुंबई - दिल्लीत राजकीय धुराळा उडतोय. निवडणुकांच्या निमित्ताने दिल्लीतील राजकीय वातावरण तापलंय. येत्या ८ तारखेला दिल्लीतील नागरिक मतदारांचं भविष्य EVM मशीनमध्ये बंद करणार आहेत. येत्या ११ तारखेला  दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल देखील समोर येतील. अशात अनेक सर्वेक्षणांमधून दिल्लीत पुन्हा आम आदमी पक्ष म्हणजेच केजरीवाल सरकार सत्तेत येणार असं म्हटलंय. 

अशात महाराष्ट्रातील दिग्गज नेते भाजपासाठी प्रचार करण्यासाठी थेट दिल्लीत दिसलेत. कधी सभा घे, तर कुठे प्रचाराला जा, तर कधी थेट पत्रकं वाटप करताना महाराष्ट्र भाजपचे अनेक मोठे नेते आपल्याला पाहायला मिळालेत. दरम्यान हाच मुद्दा धरत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे.  "महाराष्ट्रात चाललं नाही 'ते' दिल्लीत काय चालणार", असा खोचक टोला राष्ट्रवादीने भाजपला लगावला आहे. याबाबत राष्ट्रवादीकडून भाजपाला दिल्ली जिंकता येणार नाही म्हणूनच त्यांनी दिल्लीत होणाऱ्या प्रचार सभांची संख्या देखील दुप्पट केल्याचं म्हटलंय. 

भाजपचे राष्ट्राची नेते अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दिल्लीत प्रचार करतायत. अशात महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे हे सर्व नेतेत दिल्लीत प्रचार करतायत. दरम्यान दिल्ली निवडणुकांचं टायमिंग साधत आता राष्ट्रवादीने भाजपाला खोचक टोला लगावला आहे.  

NCP pokes BJP over maharashtra leaders campaigning for delhi assembly elections

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Home Sales : घरविक्रीचा वेग पुरवठ्यापेक्षा अधिक; पुण्यात वर्षभरात ८१ हजारांहून अधिक घरांची विक्री

Latest Marathi News Live Update : मोडनिंबमध्ये मध्यरात्री उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

Rajya Sabha Politics: राज्यसभा निवडणूक बिनविरोध शक्य, आजोबा - नातू एकाचवेळी राज्यसभेत; एकनाथ शिंदेंनी आपल्याच नेत्यांचा केला गेम

'लोकांनी ऐकण्याची क्षमता गमावलीय' नोरा फतेही नेटकऱ्यांवर संतापली, म्हणाली...'समर्थन करणं हे...'

Kannad Accident : कन्नड-वैजापूर मार्गावर अपघात; जेहूरचा तरुण जागीच ठार

SCROLL FOR NEXT