Sharad Pawar 
मुंबई

शरद पवार यांना ब्रीच कँडी रूग्णालयातून डिस्चार्ज

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करून दिली माहिती

विराज भागवत

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी महत्त्वाची माहिती दिली. शरद पवार यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना रविवारी दैनंदिन वैद्यकीय तपासणीसाठी ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तपासणी दरम्यान पवार यांच्या तोंडात लहान अल्सर सापडल्यानंतर तो अल्सर काढण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला अशी माहिती राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी दिली. शरद पवार यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच काही काळ विश्रांची घेणार आहेत.

रविवारी नवाब मलिक यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केली होती. त्यात त्यांनी पवार यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली होती. "शरद पवार यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दैनंदिन वैद्यकीय तपासणीसाठी ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तपासणी दरम्यान पवार यांच्या तोंडात लहान अल्सर सापडल्यानंतर तो अल्सर काढण्यात आला. आता शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. आणखी काही दिवसांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल", असे ते म्हणाले होते. त्यानंतर आज त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

शरद पवार हे ब्रीच कँडी रूग्णालयात असताना ते तेथूनच कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेत होते. ज्या ठिकाणी पक्षाच्या नेत्यांना पवार यांच्या मार्गदर्शनाची गरज भासली, त्या नेत्यांना शरद पवार यांनी रूग्णालयातूनच मार्गदर्शन केले आणि आदेश दिले. आता ते काही काळ आपल्या निवासस्थानी आराम करणार आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर थोड्या दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया झाली. या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र रविवारी दैनंदिन वैद्यकीय तपासणी म्हणजेच रूटीन चेक-अपसाठी ते रूग्णालयात दाखल झाले, तेव्हा त्यांच्या तोंडात अल्सर असल्याचं निदर्शनास आलं होतं. तो अल्सर लगेच काढून टाकण्यात आला, असं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT