CM-Uddhav-Thackeray-Sharad-Pawar 
मुंबई

राज्याचा कारभार गतिमान करा; शरद पवारांचा ठाकरेंना सल्ला

राज्याचा कारभार गतिमान करा; शरद पवारांचा ठाकरेंना सल्ला मुख्यमंत्री ठाकरेंशी झालेल्या भेटीत नक्की काय घडलं याचं पवारांनीच दिलं उत्तर NCP Sharad Pawar Advice CM Uddhav Thackeray to speed up Government Activities

सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री ठाकरेंशी झालेल्या भेटीत नक्की काय घडलं याचं पवारांनीच दिलं उत्तर

मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेसचा स्वबळाचा नारा, शिवसेना आमदाराचा लेटरबॉम्ब, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडीची टांगती तलवार, शरद पवार-अमित शाह यांची कथित भेट, पंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील वैयक्तिक चर्चा या साऱ्या गोष्टींमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. तशातच गेल्या तीन-चार दिवसात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटी यामुळे तर चर्चांना आणखी जोर आला आहे. अशातच बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नक्की काय चर्चा झाली याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. याबद्दल आज पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उत्तर दिले. (NCP Sharad Pawar Advice CM Uddhav Thackeray to speed up Government Activities)

शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी, राज्य सरकारने कामात गतिमानता आणावी, असा सूचक सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात होते. पण अखेर शरद पवार यांनीच या बैठकीबाबत खुलासा केला. राज्याचा कारभार अधिक गतिमान काम व्हावे यावर बैठकीत चर्चा झाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, या बैठकीदरम्यान कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Sharad-Pawar-Sanjay-Raut-Uddhav-Thackeray

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत विसंवाद असल्याच्या चर्चा सुरू होत्या. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेला एक निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी परस्पर रद्द केला. त्यानंतर संजय राऊत यांनी दोन दिवसात दोन वेळा शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. त्यांची ही धावाधाव इतर नेतेमंडळींच्या आणि जनतेच्या चांगलीच नजरेस पडली होती. त्यावरून अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. पण अखेर ठाकरे-पवार भेटीनंतर या साऱ्या चर्चांना काही अंशी विराम मिळाल्याचे चित्र आहे.

(रामनाथ दवणे, संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar चा खरंच साखरपुडा झाला आहे का? चाहत्याच्या प्रश्नावर सचिन तेंडुलकरने काय दिलं उत्तर? वाचा

Mumbai News: पावसात बेघरांची दैना! मोसमी निवाऱ्यांची कमतरता, उघड्यावर राहणाऱ्यांचे हाल सुरूच

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

Pune Ward Structure : महापालिकेकडे आत्तापर्यंत प्रभाग रचनेवर १६१ हरकती

Latest Marathi News Updates: फडणवीसांनी शिंदेंना काम करु दिलं नाही- जरांगे

SCROLL FOR NEXT