NCP Sharad Pawar On 17 patients died in Chhatrapati Shivaji Maharaj Hospital in Kopari Thane Municipal Corporation  sakal
मुंबई

Thane Hospital News : '५ रुग्णांच्या मृत्यूनंतरही प्रशासनाला जाग आली नाही'; ठाण्यातील घटनेवर शरद पवार संतापले!

रोहित कणसे

ठाण्यातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराअभावी १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आले आहे. या प्रकारानंतर राज्यात खळबळ उडाली आहेत. यापूर्वी १० ऑगस्ट रोजी याच रुग्णालयात ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता रात्रभरात १७ रुग्णांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या प्रकाराची दखल घेत ट्वीट केलं आहे. शरद पवारांनी मृत्यू झालेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहिली असून यासोबतच प्रशासनाला देखील सुनावलं.

"ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काल रात्रभरात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. गेल्या काही दिवसांपूर्वीच ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही हि अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली." असे शरद पवार म्हणाले आहेत.

रुग्णांच्या मृत्यूमुळे रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला जात आहे. जीव गमावलेल्या १७ जणांपैकी २ रुग्णांना रुग्णालयातील आयसीयूमध्ये, तर २ रुग्णांना जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. तर याशिवाय, कॅज्युअल्टीमध्ये २ आणि बालरोगशास्त्रात १ रुग्ण दाखल होता.

"ही घटना धक्कादायक आहे. डॉक्टरांची अपुरी संख्या, अपुरी सामुग्री आदी कारणांमुळे या घटना घडत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. याकडे मुख्यमंत्री, ठाणे महापालिका आणि आरोग्यमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष देऊन सकारात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे", अशी प्रतिक्रीया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT