'NeoCov' sakal
मुंबई

'NeoCov' चा धोका किती? टास्क फोर्सचं मुंबईकरांना आवाहन

भाग्यश्री भुवड

मुंबई : आता मुंबईतही नियोकोव या नवीन विषाणूबाबत मंथन सुरू झाले आहे. टास्क फोर्सने मुंबईकरांना वेगाने पसरणाऱ्या या विषाणूबाबत काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार, सध्या प्रत्येकाने आपले लक्ष कोविडवर केंद्रित केले पाहिजे आणि नियोकोव बद्दल काळजी करू नये. हा व्हेरियंट कोरोनापेक्षाही धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. टास्क फोर्सने स्पष्ट केले आहे की, आतापर्यंत या विषाणूचा मानवी शरीरावर परिणाम झाल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.

चीनमधील संशोधकांना नियोकोव या नवीन विषाणूचा शोध लागला आहे. संशोधकांच्या मते हा विषाणू दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये आढळून आला आहे. हा विषाणू फक्त प्राण्यांमध्ये पसरला होता. संशोधकांच्या मते, विषाणू मानवी पेशींमध्ये घुसण्यासाठी फक्त एक उत्परिवर्तन आवश्यक आहे. याबाबत मुंबईत मंथन सुरू झाले आहे. मात्र, टास्क फोर्सने मुंबईकरांना या विषाणूबाबत काळजी करू नका, असे आवाहन केले आहे.

कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांच्या मते, सद्यस्थितीत विषाणूच्या उत्पत्तीबाबत परिस्थिती स्पष्ट नाही. हा विषाणू मानवी शरीरात असल्याचा कोणताही पुरावा आतापर्यंत सापडला नाही. सध्या मुंबईकर आणि आरोग्य यंत्रणांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपले लक्ष केंद्रित करावे लागेल. मुंबईकरांना कोरोनाचा सामना करण्यासाठी कोविड प्रोटोकॉल पाळणे बंधनकारक आहे.

मुंबईच्या खासगी कोविड रुग्णालयाचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले की, मुंबईकरांना सध्या या नवीन विषाणूपासून घाबरण्याची गरज नाही. सध्या हा विषाणू वटवाघुळांमध्ये आढळला आहे. उत्परिवर्तनानंतरच त्याचा मानवी शरीरात प्रसार होण्याची शक्यता असू शकते, परंतु असे कोणतेही उदाहरण आजपर्यंत आढळून आलेले नाही. वुहान युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हे शोधून काढले आहे पण मुंबईकरांनी या विषाणूबद्दल काळजी करण्याची गरज नाही.

नियोकोव म्हणजे काय?

नियोकोव, हा शब्द मार्स-सीओवी शी संबंधित व्हायरसच्या प्रकारासाठी वापरला गेला आहे. मार्स-सीओवी, सार्स सीओवी-2 प्रमाणे, कोरोनाव्हायरस कुटुंबातील आहे आणि सात ज्ञात कोरोनाव्हायरसपैकी एक आहे जो मानवांना संक्रमित करू शकतात. 2010 च्या दशकात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि दक्षिण कोरियामध्ये मार्स-सीओवीचा मोठा उद्रेक झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT