नेरूळमध्ये चक्क रिक्षातच वृक्षलागवड! काही दिवसात लागली फळे... 
मुंबई

नेरूळमध्ये चक्क रिक्षातच वृक्षलागवड! काही दिवसात लागली फळे...

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पर्यावरणाचा समतोल राखण्यात वृक्षांचा मोठा वाटा असल्याचे महत्त्व पटल्याने आपणही पर्यावरण रक्षणासाठी खारीचा वाटा द्यावा, या हेतूने झपाटलेल्या एका रिक्षाचालकाने चक्क आपल्या रिक्षातच कुंड्यांमध्ये वृक्षलागवड केली आहे. या छोट्याशा कृतीमुळे प्रभावित झालेल्या जवळपास हजारभर प्रवाशांनी स्वतःच्या घरातदेखील वृक्ष लागवड केली असल्याची माहिती उमर खान या रिक्षाचालकाने दिली आहे.

नवी मुंबई येथील नेरूळ परिसरातील करावे गावात राहणाऱ्या उमर खान या रिक्षाचालकाला पर्यावरण रक्षणाच्या ध्यासाने झपाटले आहे. सध्याच्या प्रदूषणकारी युगात नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहचत आहे. जवळपास पाच वर्षांपासून नवी मुबंई परिसरात रिक्षा व्यवसाय करत असून मध्य प्रदेशातून नवी मुबंईत पोटापाण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबईत आल्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी काही तरी योगदान देणे आवश्‍यक असल्याचे लक्षात आले; मात्र संसाराच्या रहाटगाड्यात काही करणे शक्‍य होत नसल्याने रिक्षातच वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

उमर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यात अनेकदा भाड्याच्या रकमेवरून खटके उडताना दिसतात; मात्र आपण करत असलेल्या या कामामुळे अनेक प्रवासी रिक्षेतून प्रवास केल्यानंतर वादविवाद करण्याऐवजी ज्यादा भाडे देऊन जात असल्याने आपल्या उत्पन्नातदेखील वाढ होत असल्याचे सांगतात. उमर यांनी रिक्षात लागवड केलेल्या काही वृक्षांना आता फळे लागली असून, रिक्षेतील छोटेखानी लिंबाचे वृक्ष लिंबानी बहरले असल्याचे पाहून प्रवासीदेखील आनंद व्यक्त करत आहेत. 

२२ हजार रुपये खर्च
११ महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या रिक्षातच वृक्षलागवड करण्याची संकल्पना उमर यांना सुचिली. या संकल्पनेनुसार रिक्षामध्ये विविध प्रकारच्या ९ वृक्षांची कुंडीत लागवड केली आहे. रिक्षेच्या छतावर कृत्रिम गवत लावून रिक्षेला छोट्याशा उद्यानाचे स्वरूप देण्यासाठी उमर यांना जवळपास २२ हजारांपेक्षा जास्त खर्च आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT