bridge sea wood-Belapur
bridge sea wood-Belapur sakal media
मुंबई

MRVC: हार्बर रेल्वेच्या सीवूड- बेलापूरदरम्यान उभारला नवीन पूल

कुलदीप घायवट

मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (MRVC) च्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) 3 अंतर्गत हार्बर रेल्वेवरील (Harbor railway) सीवूड ते बेलापूर (Sea wood to Belapur) दरम्यान नवीन पादचारी पूल उभारला आहे. हा पूल 74 मीटर लांब आणि 4 मीटर रूंद आहे. या पुलामुळे (New Bridge) रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांना (Accident) आळा बसणार आहे. प्रवाशांनी रेल्वे रूळ न ओलांडता पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे. ( New bridge constructed between sea wood Belapur for travelers - nss91)

रेल्वे रूळ ओलांडून अनेकाचा अपघात होतो. यामध्ये अनेक प्रवाशांचा जीव जातो किंवा जखमी होण्याचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे एमआरव्हीसीच्या एमयुटीपी 2 ए आणि 3 प्रकल्पामध्ये प्रवाशांना प्रवासीभिमुख सुविधा देण्यासाठी भर दिला आहे. रेल्वे रूळ ओलांडून होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने पादचारी पूल उभारण्यावर भर दिली आहे. त्यामुळे एमआरव्हीसीने दोन स्थानकांदरम्यान पादचारी पूल उभारण्यावर विशेष भर दिला आहे.

एमयुटीपी 3 ए अंतर्गत 36 मीड सेक्शनमध्ये पादचारी पूल उभारण्यासाठी 551 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. पश्चिम रेल्वेच्या 6 तर, मध्य रेल्वेच्या 2 मीड सेक्शनमध्ये पूल उभारले आहेत. सीवूड ते बेलापूर दरम्यानच्या तीन किमी लांबीच्या मार्गात हा नवीन पूल उभारला आहे. एमयूटीपी 3 अंतर्गत किमी 37/14 येथे हा नवीन पूल असून या कामासाठी 1 कोटी 91 लाख रुपयांचा खर्चा आला आहे. या पुलामुळे पूर्व-पश्चिमेला जाणाऱ्या नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडावा लागणार नाही.

खार स्थानकातून वांद्रे दिशेकडे जाणारा नवा पादचारी पूल

पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनसला ये-जा करण्यासाठी वांद्रे ते खार रोड दरम्यान नवीन पादचारी पुलाची निर्मिती केली आहे. हा 247.26 मी. लांब आणि 6 मी. रुंद आहे. यामुळे खार स्थानकात उतरून प्रवासी वांद्रे जाऊ शकतील. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यामधून येणाऱ्या प्रवाशांना याचा खूप लाभ होणार आहे. यासह ट्रेस पासिंगमुळे होणाऱ्या समस्या कमी होतील. आर्थिक वर्ष 2021-22 मधील उपनगरीय रेल्वेवरील हा पहिला पादचारी पूल आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT