school
school 
मुंबई

आठवी ते बारावीपर्यंतचे शाळा वर्ग सुरू करण्यासाठी नवीन जीआर

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्यात कोरोना मुक्त (corona free village) गावात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा, (school) वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने (scool education dept) आज नवीन जीआर (gr) जारी केला आहे. यामध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्या समितीच्या निर्णयानुसार शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी जे गाव महिनाभरापूर्वी कोरोना मुक्त झाले अशा गावात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा, वर्ग सुरू केले जाणार आहेत. (New gr in maharashtra for starting schools from eight to twelve)

दोन दिवसांपूर्वी शिक्षण विभागाकडून आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा, वर्ग सुरू करण्यासाठी एक जीआर जारी केला होता, मात्र त्यात काही त्रुटी असल्याचे सांगत तो मागे घेण्यात आला होता. आज नव्याने जारी करण्यात आलेल्या जीआर मध्ये पालकांच्या सोबत चर्चा करून निर्णय घेण्याऐवजी गावातील थेट सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या समितीत तलाठी, ग्रामसेवक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे सदस्य असणार आहेत. तर प्राथमिक आरोग्य केंद्र यातील वैद्यकीय अधिकारी ही निमंत्रित सदस्य म्हणून या समितीत असतील.

नवीन जीआर मध्ये देण्यात असलेल्या मार्गदर्शक सूचनामध्ये शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी गाव हे एक महिन्यापूर्वी कोविड मुक्त असले पाहिजे. तसेच ज्या गावात जास्त विद्यार्थी असतील, त्याशाळा दर दिवशी दोन सत्रांमध्ये भरवण्यात याव्यात, प्रत्येक वर्गाचा कालावधी हा तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये त्यामुळे प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाची सुट्टी नसेल,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने..

शाळांतील शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यावर नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा अशा सूचना त्यात देण्यात आल्या आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्यासच शाळेत उपस्थित राहण्याची मुभामिळणार आहे तर दुसरीकडे आजारी पडल्यास रजेवर जाण्याची परवानगी मिळणार आहे.

विद्यार्थ्यासाठी अशा आहेत सूचना

विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळा परिसरात प्रवेश देऊ नये. विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद केल्या जाव्यात. विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार करावेत.

शाळेत होणार दररोज थर्मल स्क्रीनिंग..

शाळा प्रत्येक दिवशी सकाळ आणि दुपार अशा ठराविक सत्रात सुरू केल्या जाव्यात. एका वर्गात पंधरा ते वीस विद्यार्थी एका बाकावर एकच विद्यार्थी दोन बाका मधील सहा फुटांचे अंतर मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.शाळेत येणाऱ्या विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी वर्गाची दररोज थर्मल स्क्रीनिंग चाचणी घेण्यात यावी. आणि चिंता निराशा यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या नोंदवणाऱ्या किंवा सांगणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांसाठी नियमित समुपदेशन केले जाईल.

गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध..

परिपाठ स्नेहसंमेलन व इतर कार्यक्रमावर कडक निर्बंध असतील, त्यामुळे शाळात असे कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत, सोबत शिक्षक, पालक यांच्या कोणत्याही बैठका ऑनलाइन घेतल्या जाव्यात, तसेच विद्यार्थ्यांची उपस्थितीसाठी शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी चर्चा करावी, आणि त्यानंतर निर्णय घेतला जावा, अशा ही सूचना देण्यात आल्या आहेत.

उपस्थिती बंधनकारक नसेल .

विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णता पालकांच्या संमत्तीवर अवलंबून असेल. शाळेचा परिसर दररोज स्वच्छ केला जावा हात धुण्यासाठी सर्व ठिकाणी साबण हवा व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी महत्त्वाच्या ठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात यावे.विद्यार्थ्यांना सोबत वॉटर बॉटल आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे, शाळा स्वच्छ करण्यासाठी विद्यार्थ्यांचा कोणताही सहभाग करून घेऊ नये,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Video: काय होतास तू काय झालास तू ? इम्रान खान की आजोबा, पाकच्या माजी पंतप्रधानांचा सोशल मिडीयावरील व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : भाजप महिला मोर्चाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संतप्त जमावाने पेटवली शाळा

Biotin Rich Food : केस, त्वचा, मधुमेह आणि बरंच काही…; बायोटीनयुक्त पदार्थ खा अन् या आजारांची कायमची सुट्टी करा!

SCROLL FOR NEXT