new Satellite airport in Palghar Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray mumbai sakal
मुंबई

पालघरमध्ये उभारणार नवीन विमानतळ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

३०० एकर जागेत ‘सॅटेलाइट’ एअरपोर्टचा प्रस्ताव

संजय मिस्कीन

मुंबई : मुंबईच्या विमानतळावरील वाढता प्रवासी भार कमी करण्यासाठी पालघर जिल्ह्यात नवीन ‘सॅटेलाईट’ विमानतळ उभारण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमान प्राधिकरणाच्या बैठकीत घेतला. तब्बल ३०० एकर जमिनीवर हा विमानतळ उभारण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या सरकारी जागांचा अहवाल तातडीने सादर करत प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.

मुंबईतील विमानतळावर सध्या प्रचंड ताण आहे. त्यातच ठाणे, कल्याण, वसई, विरार या भागात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढत आहे. याशिवाय, जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची पालघर जिल्ह्याची क्षमता आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील ताण कमी करून पालघरमध्ये नवीन अत्याधुनिक विमानतळ उभा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. यासाठी प्रशासनाने देखील पालघरमध्ये सरकारी जमिनीची उपलब्धता असून, एमएमआरडीएच्या विस्तारित क्षेत्रातील प्रवासी आणि पर्यटकांना हे विमानतळ सर्वाधिक सोयीचे ठरेल असा प्रतिसाद दिला. त्यावर लवकरात लवकर या विमानतळाचा आराखडा तयार करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान, आजच्या बैठकीत शिर्डी येथील विमानतळाबाबतही चर्चा झाली.

मुंबईवरील भार कमी होणार

  • मुंबईवरचा भार कमी करण्याचा हेतू

  • जागा संपादन अन् प्रकल्प अहवालाचे निर्देश

  • पर्यटनासह प्रवासी सोयींचा आराखडा होणार

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रशासनाला सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT