मुंबई

सोनू जलान बेटिंग प्रकरणात नवा टि्वस्ट, साक्षीदाराची पलटी

क्रिकेट बेटिंगच्या प्रकरणात ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप

सुरज सावंत

मुंबई: ठाणे खंडणीविरोधी पथकाने २०१७ च्या सुमारास क्रिकेट बेटिंग प्रकरणात (cricket betting case) बुकी सोनू जलान (sonu jalan) विरोधात गुन्हा नोंदवला होता. आता या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेशण विभाग SIT कडून चौकशी सुरू असताना एक नवीन टि्वस्ट आलं आहे. या प्रकरणी गुन्ह्यांशी संबधित व्यक्तींनाही चौकशीला बोलावले जात असताना, एका साक्षीदाराने पलटी मारली आहे. चिराग मजलानी असं या साक्षीदाराचं नाव असून त्याने ठाणे पोलिसांवरच उलट गंभीर आरोप केला आहे. (New twist in sonu jalan cricket betting case witness change his statment & alledge on thane police)

सोनूने त्याच्याविरोधात क्रिकेट बेटिंगचा खोटा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं म्हटलं होतं. या गुन्ह्याबाबत त्याने राज्याचे गृहमंञी, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर ठिकाणी तक्रार नोंदवून दाद मागितली होती.

सोनुवर क्रिकेट बेटिंग प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात चिराग मजलानी या साक्षीदाराने आता चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. चिराग मजलानीने आधी सोनू जालानविरोधात साक्ष दिली होती. आता त्याने पोलिस चौकशीत पोलिसांनी या गुन्ह्यात साक्षीदार बनण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी त्याचा घेतलेला जबाब हा पोलिसांनीच लिहिला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सोनू जालानने या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

परमबीर सिंग आणखी गोत्यात

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या अडचणी आता आणखी वाढवण्याची शक्यता आहे. क्रिकेट सट्टेबाज सोनू जालान (Cricket bookie Sonu Jalan) याने काही दिवसांपूर्वी गुन्हे अन्वेषण विभाग (CID) ला दिलेल्या जबाबात खळबळजनक आरोप केला आहे. "मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्याला 'मोठ्या केस'मध्ये अटक नको असेल, तर माजी पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा (pradeep sharma) यांच्याकडे 10 कोटी रुपये जमा करायला सांगितले होते." असा मोठा आरोप सोनू जालानने केला आहे.

"मोठ्या प्रकरणात अटक टाळायची असेल, तर माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याकडे १० कोटी रुपये जमा कर" असं परमबीर सिंग यांनी आपल्याला सांगितल्याचा आरोप सोनू जालानने केला आहे. सोनू जालानच्या आरोपावर परमबीर सिंग किंवा प्रदीप शर्मा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सीआयडी परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्यावर करण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपांची चौकशी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT