मुंबई

मुंबईतील पाण्यात आढळला सर्वात मोठा विषाणू; नाव बॉम्बे व्हायरस..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, एक असं शहात जिथे देशातूनच नाही तर परदेशातूनही अनेक लोकं रोजच्या रोज येत असतात. अशात आम्ही तुम्हाला सांगितलं की मुंबईतील पाण्यात एक मोठा व्हायरस आहे, तर ? जशी तुम्हाला चिंता वाटली तशी आम्हाला देखील वाटली. आणि म्हणूनच आम्ही याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.

नक्की 'हा' व्हायरस काय आहे ? 

मुंबईत करोडो लोकं राहतात. अशात तुमच्या आयुष्याशी निगडीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाणी. जर तुमचं पाणीचं दुषित असेल तर तुम्हाला अनेक गंभीर आजत होऊ शकतात. मुंबईतील पाण्यात एक वेगळाच व्हायरस/ विषाणू  आढळून आलाय. या विषाणूंची वाढ इतर विषाणूंच्या तुलनेत खूप वेगवान आहे. हे विषाणू पाण्यात आढळणाऱ्या विषाणूंपेक्षा मोठे आहेत. याला शास्त्रज्ञांनी 'वांद्रे मेगाव्हायरस', 'कुर्ला व्हायरस' अशी नावे दिली आहेत. 

हा व्हायरस करतो काय ? 

  • इतर व्हायरस पेक्षा हा व्हायरस मोठा आहे 
  • हा व्हायरस एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो 
  • एका शरीरातून दुसर्या शरीरात जाताना हा व्हायरस शरीरातील DNA माहिती गोळा करतो 
  • हा व्हायरस एका शरीरातील DNA दुसऱ्या शरीरात जातात 

कुणी आणि कसं केलं संशोधन ? 

जैवतंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान तंत्रज्ञान विभागाने याबाबतचं संशोधन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यवर मुंबईतील IIT मधील शास्त्रज्ञ डॉ. किरण कोंडाबागील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल पाच वर्ष शोधकार्य केलंय. यामध्ये २० नवीन विषाणू आढळून आले आहेत. 

संशोधनादरम्यान विविध शहरांच्या जलाशयांमधील पाण्याची चाचणी केली गेली. त्यांनी शोधलेल्या महाकाय विषाणूंना वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत. पवई लेक व्हायरस, मिमी व्हायरस बॉम्बे, वांद्रा व्हायरस, कुर्ला व्हायरस अशी ही नावं आहेत. 1992 मध्ये इंग्लंडमध्ये अशा प्रकारचा विषाणू सापडला होता. यानंतर याबद्दल संशोधनाला सुरवात झाली. 

काही दिवसांपूर्वी मुंबईतील पाणी पिण्यासाठी उत्तम असा अहवाल प्रकाशित झाला होता. यानंतर अशी बातमी वाचल्यानंतर सर्वांना धक्का बसणं स्वाभाविक आहे. मात्र काळजी करू नका, संशोधकांच्या या व्हायरसमुळे आरोग्याला कोणताही धोका नाही. 

WebTitle : new type of virus found in water of mumbai its called as kurla virus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT