मुंबई : रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २०२० मध्ये अधिक सक्षम होण्याचा संकल्प केला आहे. आगामी वर्षात पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकातील अपुरे पादचारी पूल, लिफ्ट, वायफाय, सरकते जिने आदी सुविधांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल जानेवारी २०२० मध्ये प्रत्यक्षात रुळावरून धावणार आहे. त्यानंतर लगेचच मार्चमध्ये दुसरी लोकलही मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यामुळे आगामी वर्षात मध्य रेल्वेचा प्रवास गारेगार होणार आहे.
ही बातमी वाचली का : टीएमटीच्या प्रवासी संख्येत घट
२०१९ मध्ये सुरुवातीपासून मध्य रेल्वे प्रशासनाला लेट मार्क, तांत्रिक बिघाड, गर्दीच्या नियोजनातील अपयश आदींमुळे अनेक दुर्घटनांना सामोरे जावे लागले. त्यासाठी मध्य रेल्वे आगामी वर्षात रेल्वेस्थानकातील गर्दी नियोजनासाठी १२३ सरकते जिने बसवणार आहे. ५६ रेल्वे पादचारी पूल उभारण्याचे आव्हानही मध्य रेल्वेसमोर आहे. अपंग प्रवाशांसाठी रेल्वेस्थानकात १२७ लिफ्ट बसवण्यात येणार आहेत.
ही बातमी वाचली का : नववर्षात कटिंगमागे एक रुपयाची वाढ
प्रवासी सुविधेसाठी आणखी ३५ स्थानकांवर वायफाय सुविधा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यासोबतच तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी एटीव्हीएम मशीनच्या संख्येत वाढ होणार आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधील प्रवासही सुटसुटीत होणार आहे. एक्स्प्रेसला नवीन एलएचबी कोच बसवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेच्या सोयी-सुविधांमुळे नवीन वर्षात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
हार्बर मार्गावर पहिली एसी लोकल
प्रवाशांना गारेगार प्रवासासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात २०२० मध्ये सहा एसी लोकल दाखल होणार आहेत. जानेवारीत पहिली लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-पनवेल-वाशी मार्गावर मार्गस्थ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.