पाम बीच मार्गावर मंगळवारी वाहतूक कोंडी झाली होती.  
मुंबई

नववर्षाची सुरुवात कोंडीत

सकाळ वृत्तसेवा

खारघर : खारघर हिरानंदानी पुलावर रस्त्यावर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे पनवेल-शीव महामार्गावर बेलापूर ते खारघरदरम्यान नेहमीच वाहतूक कोंडी होते. अशातच मंगळवारी (ता.३१) महामार्गावर मुुंबईकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोत बिघाड झाल्यामुळे रात्री साडेनऊ ते अकराच्या सुमारास सीबीडी ते उत्सव चौक आणि हिरानंदानी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दोन किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी एक ते दीड तास लागल्याने अनेकांना नवीन वर्षाचे स्वागत रस्त्यावरच करावे लागले. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्‍त करण्यात आली. 

बेलापूरकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या शीव-पनवेल महामार्गावरील हिरानंदानी पुलावर एका लेनवर सिमेंट काँक्रीटीकरणचे काम सुरू आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून बेलपाडा ते हिरानंदानी पुलावर वाहने धीम्या गतीने धावत आहेत. परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास बेलापूरकडून पनवेलला जाणारा टेम्पो भर रस्त्यावरच बंद पडला. त्यामुळे पनवेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांनी पनवेल- पुण्याकडे जाण्यासाठी खारघरमीाल भारती विद्यापीठाजवळून उत्सव चौक, बॅंक ऑफ इंडियाकडून हिरानंदानीकडे जाणाऱ्या रस्त्याने वाहने वळविली. परिणामी, बेलपाडा गाव बसथांबा, उत्सव चौक, बॅंक ऑफ इंडिया, हिरानंदानी पुलामार्गे पनवेल; तसेच पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT