मुंबई

...नाही तुला 'हे' करावंच लागेल

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : भारतात नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवून नायजेरीया देशातून भारतात आणलेल्या एका 21 वर्षीय तरुणीला नायजेरीयन दाम्पत्याने वेश्याव्यसायात ढकलल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील पिडीत नायजेरीयन तरुणीने पाच महिन्यानंतर स्वत:ची सुटका करुन घेत, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी या घटनेतील नायजेरीयन दाम्पत्यासह तीघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.यातील एका नायजेरीयन नागरिकाला नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने यापुर्वीच जन ओखाफर या नायजेरियनला अटक केली आहे. 

या घटनेतील 21 वर्षीय पिडीत तरुणी मुळची नायजेरीया देशातील असून ती हेअरस्टाईलीस्ट आहे. मागील वर्षामध्ये ती तिच्या देशात नोकरीच्या शोधात असताना जानेवारी-2019 मध्ये तीला किंगस्ली नावाच्या व्यक्तीने तीच्याशी मैत्री वाढविली. त्यानंतर त्याने त्याची बहिण ग्रेस ओखाफर ही भारतामध्ये असल्याचे सांगून ती भारतामध्ये तीला चांगली नोकरी मिळवून देईल,असे सांगून तीला पैसे दिले. त्यानंतर त्याने स्वत:चे पैसे खर्च करुन पिडीत तरुणीचा व्हिसा व पासपोर्ट बनवून देऊन पिडीत तरुणीला गत जून महिन्यात नायजेरीया देशातून भारतात पाठवले होते. पिडीत तरुणी दिल्लीमध्ये विमानाने उतरल्यानंतर दिल्ली विमानतळावर एका अनोळखी महिलेने तीला रेल्वेचे तिकीट काढून दिल्याने पिडीत तरुणी रेल्वेने मुंबईत सीएसटी रेल्वे स्टेशनमध्ये दाखल झाली. 

सीएसटी रेल्वे स्थानकात ग्रेस व तीचा पती जन ओखाफर हे दोघे भेटल्यानंतर त्यांनी पिडीत तरुणीला टॅक्सीने डोंबिवली येथील लोढा पलावा येथील फ्लॅटमध्ये नेऊन ठेवले.त्यानंतर त्या दोघांनी पिडीत तरुणीला धमकावून तीला वेश्याव्यसाय करण्यास भाग पाडले. वेश्याव्यवसाय न केल्यास तीला ठार मारुन नदीत फेकून देण्याची धमकी देण्याबरोबरच त्यांनी ऑफ्रीका देशातील अंधश्रद्धेबाबत भिती दाखवुन तीला त्यासंदर्भातील व्हिडीओ दाखविले. त्यानंतर त्या दोघांनी पिडीत तरुणीला एका ग्राहकासोबत वेश्यागमनासाठी 7 दिवस खारघरमध्ये पाठविले. त्याबदल्यात मिळालेले 13 हजार 500 रुपये पिडीत तरुणीने ग्रेसला दिल्याचे पिडीत तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 

त्यानंतर पिडीत तरुणीने वेश्याव्यवसाय करुन मिळविलेली 2 लाख 10 हजार रुपये ग्रेसला दिल्यानंतर देखील ग्रेस तीला वेश्याव्यसाय करुन 12 लाख रुपये देण्यासाठी धमकावत होती. अखेर पिडीत तरुणीने गत नोव्हेंबर महिन्यामध्ये ग्रेसच्या ताब्यातून सुटका करुन घेत, नायजेरीयन स्टुडन्ट्स ऍन्ड कम्युनिटी वेल्फेअर असोसिएटमध्ये कार्यरत व्यक्तींची भेट घेऊन त्यांची मदत घेतली.त्यानंतर त्यांच्या माध्यमातून पिडीत तरुणीने ग्रेसकडे आपला पासपोर्ट आणि व्हिजाची मागणी केली. मात्र ग्रेसने पासपोर्ट आणि व्हिजा देण्यास नकार देऊन तीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.त्यामुळे पिडीत तरुणीने डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

त्यानुसार पोलिसांनी ग्रेस जन ओखाफर व तीचा पती जन ओखाफर आणि खारघर येथील रुममालक नगोझी या तीघांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करुन सदरचा गुन्हा खारघर पोलिसांकडे वर्ग केला आहे.दरम्यान,या घटनेतील जन ओखफर याला गत आठवडयात नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थाच्या विक्री प्रकरणात जन ओखाफर याला अटक केली आहे.  

Nigerian couple pulled Nigerian girl in dirty business case registered in kalyan 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने 'कलम 370'ला आपल्या अवैध मुलाप्रमाणे सांभाळलं; अमित शाहांची बोचरी टीका

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT