Mumbai-Local 
मुंबई

राज्यात उद्यापासून नाईट कर्फ्यू; मुंबई लोकलबद्दल महत्त्वाचा निर्णय

विराज भागवत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेला लॉकडाउनचा इशारा दिला. मी लॉकडाउन लावत नाही पण संपूर्ण लॉकडाउनचा इशारा देतोय असं ते म्हणाले. विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधून आणि चर्चा करून मगच लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. त्याचसोबत शनिवारी झालेल्या बैठकीनंतर, 'हे बंद करा, ते बंद करा ही आपली भूमिका नाही पण आता जिंदगी, जान, उसके बाद काम' या पद्धतीने जावे लागेल', असेही ते म्हणाले. त्यामुळे रविवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत लॉकडाउनचा निर्णय घेतला जाणार हे जवळपास निश्चित होतं. पण लोकभावनेचा विचार करता अखेर संपूर्ण लॉकडाउन न लावता कठोर निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी मिनी लॉकडाउनबद्दल माहिती दिली. त्यातील ठळक मुद्दे-

- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब
- दररोज रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत नाईट कर्फ्यू. केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा
- कठोर निर्बंधांची अंमलबजावणी उद्या रात्री आठ वाजल्यापासून
- सार्वजनिक वाहतूक सुरू पण त्यातही निर्बंध लागू
- बसेस, टॅक्सी, रिक्षा, ट्रेन या सुविधा सुरू राहतील. ट्रेन, बसमध्ये केवळ आसनक्षमतेनुसार प्रवास; उभ्याने प्रवासास परवानगी नाही
- रात्रीच्या वेळी टॅक्सी किंवा रिक्षातून अत्यावशक सेवा पुरवणाऱ्यांना प्रवासास मुभा
- राज्यात शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ 'वीकेंड लॉकडाउन'. तर इतर दिवशी नाईट कर्फ्यू
- दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सल सेवा सुरू ठेवण्यास मुभा
- शक्य त्या ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम सुविधा वापरण्यावर भर
- धार्मिक स्थळांवरील निर्बंध कठोर केले असून केवळ ठराविक व्यक्तींच्या उपस्थितीतच धार्मिक स्थळे सुरू
- सिनेमागृह, नाट्यगृहे पूर्णपणे बंद राहणार
- मैदाने, प्ले-ग्राउंड्स पूर्ण बंद
- मॉल सुरू करण्यासाठी लसीकरण सक्तीचे
- कोणत्याही चित्रपटाच्या किंवा सिरियलच्या मोठ्या प्रमाणावरील शूटिंगला बंदी
- जिल्हाबंदी नाही
- फक्त लसीकरण सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT