मुंबई

मुंबईकरांनो पुढील पंधरा दिवस आहे 'नाईट कर्फ्यू', जाणून घ्या कसे असतील नियम

समीर सुर्वे

मुंबई, ता. 20 : इंग्लडमधील कोविडच्या नव्या प्रकारानंतर राज्य सरकारसह महापालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे कोविडच्या अगदीच्या सुरवातीच्या काळात झालेल्या चुका परत होऊ नयेत यांची खबरदारी घेतली जातेय. 1 फेब्रुवारी ते 22 मार्च या काळात परदेशातून आलेल्या प्रवाशांवर कोणतीही बंधने नसल्याने मुंबई, महाराष्ट्रासह भारतात कोविड वाढला. यातून धडा घेत आता नव्या कोविडशी लढण्यासाठी सर्वच यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत.

‘फेब्रुवारी मार्च काळात परदेशातून 2 लाख प्रवासी मुंबईत आले. त्यांच्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात कोविड पसरला. त्यामुळे आता खबरदारी घेत आहोत’ असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. पुढे चहल म्हणालेत की, रात्रीचा कर्फ्यू म्हणजे लॉकडाऊन नाही. अत्यावश्यक सेवांवर कोणातही परीणाम होणार नाही.  पाचपेक्षा जास्त माणसांना जमण्यासाठी परवानगी नाही. नागरीकांनी घाबरुन जाऊ नये.   

मुंबईसह भारतातील सर्व विमानतळावर 18 जानेवारी 2020 पासून चिन तसेच त्या परीसरातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येत होती. त्यात टप्प्याटप्प्याने काही देशांची संख्या वाढविण्यात आली. मात्र, 9 मार्च रोजी राज्यात पहिला कोविड रुग्ण आढळला. हे कुटूंब आखाती देशातून आले हाेत. तर, मुंबईत आढळेला पहिला रुग्णही याच प्रवाशांबराेबर आला होता. त्यानंतर राज्य सरकारने आखाती देशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनींग करण्याचीही परवानगी केंद्र सरकारकडे मागितली गेली होती. तसेच काही प्रवासी परदेशातून इतर देशांमध्ये जाऊन नंतर मुंबई विमानतळावर येत होते. 

दरम्यान, सुरवातीला झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून आता शासनाकडून खबरदारी बाळगण्यात येतेय. त्यामुळे इंग्लडमधील कोविडच्या नव्या प्रकारानंतर राज्य सरकारसह महापालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. 

  • उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू 
  • पाच जानेवारीपर्यंत लागू राहणार रात्रीची संचारबंदी 
  • संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय
  • अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय 
  • पुढील १५ दिवस अधिक सतर्क राहण्याचं आवाहन 

( संपादन - सुमित बागुल )

night curfew in mumabi for next fifteen days know all details and code of conducts

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT