मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार पुढे आल्याने मुंबईसह राज्यात रात्रीची संचारबंदीची घोषणा झाली त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील टॅक्सी व्यवसाय अडचणीत आला आहे. आधीच कोरोनाच्या भीतीने टॅक्सी चालकांना प्रवासी मिळतं नसून, त्यामध्ये रात्रीला उशिरापर्यंत टॅक्सीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांपुढे आता पुन्हा आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
राज्य सरकारने 22 डिसेंबर रोजी रात्रीला संचारबंदीची घोषणा केली, त्यामुळे रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना सुद्धा परवानगी नाही. आधीच गेल्या नऊ महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन असल्याने प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे वाहतुकदारांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले होते. दरम्यान अनेकांनी टॅक्सी विकून परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी दुसरा व्यवसायाचा पर्याय निवडला होता. त्यानंतर आता अनलॉक दरम्यान काहीप्रमाणात टॅक्सीची सेवा सुरू झाली त्यातही आता पुन्हा रात्रीची संचारबंदीमुळे रात्रीला टॅक्सी उभी ठेवण्याची वेळ टॅक्सी चालकांवर आली आहे.
राज्यात 5 जानेवारी पर्यंत ही संचारबंदी असल्याने टॅक्सी, रिक्षा, खासगी बस वाहतुकदारांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे यावर्षासह नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा संचारबंदीनेच होणार असल्याने टॅक्सी वाहतुकदारांवर आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
रायगडच्या झेडपी इमारतींना सौर ऊर्जेचा संजीवनी; अखंड वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न
टॅक्सी चालकांना दिवसाला तर प्रवासी मिळत नाहीच त्यातच आता संचारबंदीमुळे रात्रीला ही प्रवासी वाहतूक बंद करावी लागली आहे. विमानतळ, मेट्रो, लोकल, हॉस्पिटल अशा अत्यावश्यक सेवा वगळता टॅक्सीची नियमित प्रवासी सेवा रात्रीला बंद करावी लागली आहे. त्यामुळे गेल्यावर्षांसह नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा अडचणीतूनच होणार आहे.
- ए एल क्वाड्रोस,
सरचिटणीस, टॅक्सी मेन्स युनियन
Night Curfew in Mumbai Taxi business in Mumbai in trouble again due to curfew
------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.