Nilesh Rane Retirement  
मुंबई

Nilesh Rane Retirement : निलेश राणेंचा राजीनामा स्थान बळकट करण्यासाठी?

रोहित कणसे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ज्येष्ठ पुत्र ,माजी खासदार निलेश राणे यांनी अचानक दिलेला राजीनामा हा त्यांच्या कुटुंबासाठीही धक्का आहे असे समजते. निलेश राणे या वेळी लोकसभेच्या रणाऐवजी विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा विचार करत होते ,मात्र घराणेशाहीच्या विरोधात भाजपच्या एका नेत्याने विधान केल्याने नाराज झालेल्या निलेश यांनी हे पाऊल उचलले आहे काय हे चाचपडून पाहिले जाते आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातील एका नेत्याच्या मुलाने राजीनामा देणे हे टोकाचे पाऊल मानले जाते आहे. गेले काही दिवस निलेश कमालीची मेहनत करत होते. विशिष्ट मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडावा याबाबत भाजप शिंदेसेनेची प्रारंभिक चर्चाही सुरु होती. त्या विषयाला बगल मिळू नये यासाठीचे हे पाऊल आहे असेही समजते.

जिल्हाध्यक्षपदावर राणे कुटुंबाने सांगितलेली व्यक्ती नेमली गेली नव्हती. नारायण राणे यांनी ही परिस्थिती समजून घेतली, नितेश राणे यांनी तर सध्या आघाडी घेत ठाकरे परिवाराच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडणे सुरु ठेवले आहे. भावाभावांची कार्यपध्दत वेगळी असतानाच निलेश यांनी हा धक्का दिला.

त्यांच्या काही समर्थक कार्यकर्त्यांनी लगेचच राजीनामे देत त्यांना दिलेला पाठिंबा हाही चर्चेचा विषय होता. परस्पर धक्के देत हा निर्णय निलेश कुठवर रेटतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी वारंवार पराभव स्वीकारावा लागल्याने निलेश यांनी हा सूर लावला असल्याची तक्रार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, ८ ते १० राउंड फायर; सुरक्षा रक्षक जखमी, कुणी केला हल्ला?

US Iran Conflict : शांतता करार होणार नाही? इराण-अमेरिका संघर्ष पुन्हा पेटला; क्षेपणास्त्र हल्ल्यांनी खळबळ

Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

Satara Accident: उज्ज्वल भविष्याची स्वप्ने अधुरी! दुचाकी अपघातात शिरवळच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, कॉलेज प्रवेशाची माहिती घेऊन परतताना काळाचा घाला

आजचे राशिभविष्य - 03 जून 2026

SCROLL FOR NEXT