CIDCO Home sakal media
मुंबई

सिडकोच्या सहा हजार घरांसाठी १९ हजार अर्ज; नोंदणीसाठी दिली मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या (cidco) पाच हजार ७३० घरांच्या गृहनिर्माण योजनेकरिता (Housing s तब्बल १९ हजार ऑनलार्इन अर्जांची नोंदणी झाली आहे. योजनेला वाढता प्रतिसाद पाहता नागरिकांच्या विनंतीला (people request) मान देऊन २४ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ (date extension) देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या अनुषंगाने अनामत रक्कम व शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे.

सिडको महामंडळाने २६ जानेवारी २०२२ ला ५,७३० घरांच्या गृहनिर्माण योजनेस प्रारंभ केला. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील वेगाने विकसित होणाऱ्या तळोजा नोडमध्ये ५,७३० घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एकूण ५,७३० घरांपैकी १,५२४ घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि उर्वरित ४,२०६ घरे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. योजनेसाठी अर्ज करण्यास २४ फेब्रुवारी २०२२ ही अंतिम तारीख होती, परंतु कागदपत्रांची जमवाजमव करण्यास आणि अनामत रकमेची तजवीज करण्यासाठी अर्जनोंदणीस मुदतवाढ देण्याची विनंती नागरिकांकडून करण्यात येत होती.

या विनंतीस मान देऊन अर्ज नोंदणी करण्याकरिता २४ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे ऑनलार्इन अर्ज नोंदणी २४ मार्च २०२२ पर्यंत करता येणार आहे. नोंदणीनंतर ऑनलार्इन अर्ज व ऑनलार्इन शुल्कभरणा २५ मार्च २०२२ पर्यंत करता येणार आहे. स्वीकृत अर्जदारांची प्रारूप यादी ३१ मार्च २०२२; तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी ४ एप्रिल २०२२ रोजी सिडकोच्याhttps://lottery.cidcoindia.com/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. योजनेची संगणकीय सोडत ८ एप्रिल २०२२ रोजी पार पडणार आहे.

तळोजा नोड नवी मुंबईतील वेगाने विकसित होणारा नोड आहे. मुंबई-पुणे महामार्ग, रेल्वे आणि सिडकोचा मेट्रो प्रकल्प, यामुळे या नोडला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. मेट्रोचे आगार तळोजा येथे असून मेट्रो मार्गेही हा नोड सीबीडी बेलापूरला जोडला जाणार आहे. या नोडमधील काही क्षेत्र हे शाळा, पदवी महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, रुग्णालये, समाज केंद्रे, वसतिगृहे इ. सामाजिक उद्देशांसाठी राखीव आहे. मेट्रो रेल्वेच्या स्थानकांलगत वाणिज्यिक उपक्रमांकरिता काही क्षेत्र हे सिडकोकडून निश्चित करण्यात आले आहे. यामुळे तळोजा नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर वाणिज्यिक संधी निर्माण होणार आहेत. परवडणाऱ्या दरातील घरे, कनेक्टिव्हिटी, रोजगार, वाणिज्यिक प्रकल्प यांमुळे तळोजा नोड हा नवी मुंबईतील वास्तव्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे.

सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता सिडको नेहमीच कटिबद्ध आहे. सिडकोच्या नवीन वर्षातील या पहिल्या योजनेस उत्तम प्रतिसाद लाभला आहे. कागदपत्रांची जमवाजमव आणि अनामत रकमेची तजवीज करण्यास पुरेसा अवधी मिळावा म्हणून अर्ज नोंदणीकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना अर्ज करता येणार आहेत.

- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Matru Suraksha Din 2025: मातृत्व अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार कोणत्या योजना राबवतंय? जाणून घ्या आजच!

बाबो! भाईजान लग्न करतोय? सलमानच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण, नेटकरी म्हणाले...'दारु पिऊन काहीही...'

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

UAE Golden Visa confusion: 23 लाखांत मिळतोय लाइफटाइम गोल्डन व्हिसा? युएई सरकारने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT