झाड कोसळून पाळणा तुटला; मात्र, 12 दिवसांचं तान्हुलं सुखरुप बचावलं... 
मुंबई

सोसाट्याच्या वाऱ्याने झाड छप्पर तोडून पडलं १२ दिवसांच्या बाळाच्या पाळण्यावर, बाळही होतं त्यात पण...

सकाळ वृत्तसेवा

खालापूर : निसर्ग चक्रीवादळ धडकणार म्हणून सर्वत्र सतर्कता घेतली जात होती. अनेक ठिकाणी वाऱ्याच्या प्रवाहामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. मात्र, खालापुरात अवघ्या 12 दिवसांच्या बाळाने निसर्गला चकवा दिल्याने वादळी वाऱ्याने पाळण्याजवळ पडलेल्या झाडापासून बचावले आहे. 

बुधवार सकाळपासूनच सुरू झालेल्या निसर्गच्या वादळी वाऱ्यामुळे अनेकांची त्रेधा तिरपीट उडाली होती. अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडत होत्या. त्यातच खालापुरातील नावंढे आदिवासी वाडीतील संतोष लक्ष्मण पवार यांचे घरही या वादळातून सुटले नाही. संतोष यांच्या घराशेजारी असलेले ताडाचे झाड घरावर कोसळले. त्यावेळी त्यांचा नातू पाळण्यात झोपला होता. झाडांच्या फांद्या पाळण्यावर पडल्याने पाळणा तुटला; पण सुदैवाने पाळण्यातील 12 दिवसांचे बाळ सुखरूप राहिले. पाळणा तुटूनही त्या इवल्याशा काहीही झाले नाही. घटनेची माहिती मिळताच खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार, पंचायत समितीचे सदस्य अक्षय पिंगळे, खालापूर नगर पंचायत उपनगराध्यक्षा शिवानी जंगम, नगरसेवक संतोष जंगम यांनी भेट देत पवार कुटुंबाला स्थलांतरित केले. 

वादळामुळे अनेक भागांत नुकसान
निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याने जिल्हा प्रशासनाने सर्वत्र सतर्कतेचे आदेश दिले होते. दुपारी 1 नंतर खालापुरात वाढलेला वाऱ्याचा वेग आणि जोरदार पावसात साबाईनगर, महड मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर मोठी झाडे कोसळली. खडक आळी भागात चव्हाण यांच्या घराचे पत्रे उडाले. सावरोली-खालापूर रस्त्यावर विद्युत खांब कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली. तर चौक फाटा येथील मोठी होर्डिंग मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर कोसळल्याने काही दुचाकींचे नुकसान झाले आहे. 

निसर्गमुळे अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. झाडे आणि विद्युत खांब कोसळले आहेत. सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही. खोपोलीतील 1200 जणांना स्थलांतरित केले असून त्यांची पूर्ण व्यवस्था केली आहे.
- इरेश चप्पलवार, तहसीलदार, खालापूर.

खालापुरात धोकादायक घरातील 400 जणांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. जेवणाची व्यवस्था केली आहे.
- शिवानी जंगम, उपनगराध्यक्षा, खालापूर, नगर पंचायत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Vijay meeting : अमित शाह, विजय यांची गुप्त भेट? दक्षिणेतील ५ राज्यांचा वर्षानुवर्षांचा प्रश्न मार्गी लागणार; आज मोठी बैठक

US National Debt : अमेरिकेवर कर्जाचा डोंगर! पहिल्यांदाच राष्ट्रीय कर्ज ४० ट्रिलियन डॉलर पार; जगातील महासत्तेसमोर मोठे आर्थिक संकट?

Congress Lok Sabha: लोकसभेच्या जागा २५ वर्षांसाठी गोठवा; काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मागणी, देशातील आठशे शहरांत ‘छात्रों की गूंज’

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Maharashtra weather update : महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान नाही? कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे; IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT