निटको कामगारांना मोबदला मिळणार  
मुंबई

खूशखबर... निटको कामगारांना मोबदला मिळणार

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग (बातमीदार) ः श्रीगाव येथील टाईल्स निर्मिती निटको कंपनी अचानक बंद करण्यात आली. या कंपनीकडून वेतन, बोनस व अन्य मोबदला अद्याप मिळाला नाही. त्यामुळे कोकण कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांच्या दालनात आज बैठक झाली. बैठकीदरम्यान कामगारांना वेतन व मोबदला लवकरच दिला जाईल, असे आश्‍वासन कंपनीचे उपाध्यक्ष अजॉय कुरूप यांनी दिले. 

पनवेल येथील कोकण कामगार आयुक्त कार्यालयात निटको टाईल्स कंपनी बंद केल्याबाबत तसेच अन्य प्रश्‍नांबाबत आज कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांच्या दालनात बैठक झाली. या वेळी कामगार नेते साधुराम मालुसरे, दीपक रानवडे, कामगारांचे वकील नितीन शिवकर, निटको टाईल्स युनियन अध्यक्ष प्रतीक पाटील व कामगार उपस्थित होते. 

या वेळी उपायुक्त प्रदीप पवार यांनी कामगारांसह निटको टाईल्स कंपनीचे उपाध्यक्ष अजॉय कुरूप यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पवार यांनी कामगारांना थकीत वेतन व बोनस, मोबदला लवकरात लवकर देण्यास सांगितले. डिसेंबरचा पगार व दिवाळीचा बोनस येत्या चार दिवसांत देण्याचे अजॉय यांनी कबूल केले. उर्वरित पगाराची थकीत रक्कम १५ दिवसांच्या आत देण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी कामगारांनी कंपनी बंद झाली तर कामगारांना योग्य मोबदला व कंपनी पुन्हा चालू झाली किंवा दुसऱ्या व्यवस्थापनाने विकत घेऊन चालू केली तर पूर्वीच्या कामगारांना या ठिकाणी प्राधान्य द्यावे, अशीही मागणी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT