मुंबई

म्हणाले 'पवार-मलिकांचे दाऊदशी संबंध'; राणे बंधूंवर आणखी एक गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राणे पितापुत्र आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अलिकडे सातत्याने चर्चेत आलेले आहेत. इतकंच नव्हे त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर गुन्हे देखील नोंद झाले आहेत. त्यामुळे चौकशी, अटकेची शक्यता, अटक आणि त्यानंतर जामीनासाठीची पळापळ या घडामोडी राणे पिता-पुत्रांच्या बाबतीत घडताना दिसून येत आहेत. अलिकडेच दिशा सालियनबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौकशी केल्यानंतर आता राणेंवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nitesh Rane-Nilesh Rane)

यावेळी हा गुन्हा नारायण राणे (Narayan Rane) यांचे दोन पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. खासदार निलेश नारायण राणे आणि आमदार नितेश नारायण राणे यांनी जाणीपूर्वक समाजामध्ये हिंदू-मुस्लिम अशी तेढ निर्माण करून दंगली घडतील, असं भाष्य केल्यामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांचेही नाव दाऊद इब्राहिमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल आज मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी याबाबत तक्रार केली होती. काल शनिवारी उशीरा रात्री अनेक कलमांअंतर्गत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nawab Malik)

काही दिवसांपूर्वीच आझाद मैदानावर भाषण करत असताना नितेश राणे म्हटलं होतं की, अनिल देशमुख मराठा समाजातून येतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होते आणि नवाब मलिक मुस्लीम समाजातून येत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं विधान केलं होतं. हे सगळं दाऊन इब्राहिमच्या सांगण्यावरुन होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. शरद पवारांनी हा राजीनामा घ्यायला हवा होता मात्र, शरद पवार यांचेही दाऊदशी संबंध असल्याने ते हा राजीनामा घेत नसल्याचं विधान त्यांनी केकलं होतं. तर दुसरीकडे निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांचे थेट दाऊदशी संबंध असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT