मुंबई

"तर ठाकरेंचे जगात कारखाने असते"; नितेश राणेंची बोचरी टीका

"ठाकरे सरकार ज्योतिषासारखे"; व्यक्त केला संताप

विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीला आठ दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) झोडपून काढलं. या वादळाचा सर्वाधिक फटका कोकण (Konkan) किनारपट्टीला बसला. तौक्तेचा तडाखा (Damage) बसून बरंच नुकसान झालं. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळीत ग्रस्तांप्रमाणेच मदत (Help) दिली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलं. पण भाजप नेते निलेश राणे (Nilesh) यांना मात्र हे आश्वासन फारसं रूचलं नाही. त्यामुळे त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. (Nitesh Rane Slams CM Uddhav Thackeray Trolls his work style)

उद्धव ठाकरे चार-पाच दिवसांपूर्वीच कोकणचा दौरा करून गेले. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की वर-वर पाहून मदत दिली जाणार नाही. नीट अभ्यास करून योग्य ती मदत दिली जाईल. त्यानुसार ठाकरे यांनी काल मदतीचे आश्वासन दिले. त्यावरून राणे यांचा राग अनावर झाला. "हे घ्या अजून एक पोकळ आश्वासन. पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते. १० दिवस झाले एक कवडी दिली नाही. अनेक गावात अजूनही लाईट नाही. रॉ मटेरियल नाही पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषी सारखे तारखा देत आहेत", अशा शब्दात ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी २१ मे रोजी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल, असं सांगितलं होतं. "विरोधकांनी कितीही टीका केली, तरी मी कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडणार नाही. पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नुकसान भरपाईवर दोन दिवसात निर्णय घेऊ", अशी माहिती मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. "वादळात नुकसान झालेल्यांना मदत करणार, हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरून पाहणी करतोय. फोटोसेशन करायला येथे मी आलेलो नाही तर मदत करण्यासाठी आलेलो आहे", असं ते कोकण दौऱ्याच्या वेळी म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Story: २० रुपयांच्या नाण्यांत जपलेलं प्रेम… नवऱ्याने एका वर्षात बायकोसाठी जमा केलं 'सोनेरी' सरप्राइज! दुकानदारही भावूक

२७ चेंडू ११२ धावा! अजित आगरकरने ज्याला ४ सामने खेळवून हाकलले, त्याने द्विशतक झळकावून उत्तर दिले; निवड समितीला चॅलेंज...

चेहऱ्यावर व्रण, पांढरे केस आणि डॅशिंग अंदाज !वाढदिवसादिवशी शाहरुखची चाहत्यांना खास भेट; Teaser Viral !

Lucknow UNESCO Creative City for Gastronomy: लखनौच्या पाककलेची 'युनेस्को'ला भुरळ; सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश, नव्याने ५८ शहरांची भर

Nashik Kumbh Mela : कारभारी, आता जरा जोरात... नाशिकमध्ये २५ हजार कोटींच्या कामांना मिळणार गती

SCROLL FOR NEXT