Union Minister Nitin Gadkari shares a light-hearted moment about the BJP’s long-standing connection with auto rickshaws while congratulating Ravindra Chavan on becoming the Maharashtra BJP President.  sarkarnama
मुंबई

Nitin Gadkari Auto Rickshaw Comment: गडकरींनी सांगितलं ‘ऑटो रिक्षा’ अन् महाराष्ट्र भाजपचं कनेक्शन ; क्षणात एकच हशा पिकला!

Maharashtra BJP connection with auto rickshaw - जाणून घ्या, असं नितीन गडकरींनी नेमकं काय सागंतिलं की, मंचावरील मंत्र्यांपासून ते अगदी कार्यक्रमास उपस्थित असणारा कार्यकर्ता खळखळून हसला

Mayur Ratnaparkhe

Nitin Gadkari Humorous Auto Rickshaw Comment Goes Viral -महाराष्ट्र भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत. डोंबिवलीतील आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदाभार स्वीकारला आहे. यानिमित्त भाजपकडून भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. या कार्यक्रमास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे सर्व खासदार, आमदार, नेते, पदाधिकारी अन् मोठ्यासंख्येने कार्यकर्ते हजर होते.

या कार्यक्रमात भाषण करताना नितीन गडकरींचा दिलखुलास अंदाज दिसला. गडकरींनी जुन्या आठवणींना उजाळा देताना महाराष्ट्र भाजप अन् ऑटोरिक्षा यांचं कनेक्शनही सांगितलं. जेव्हा गडकरींनी उपस्थितांना याबाबत माहिती दिली तेव्हा मंचावरील नेत्यांसह कार्यक्रमास आलेल्या सर्वांमध्ये एकच हशा पिकाला.

नितीन गडकरी भाषणात म्हणाले, ‘’आज अतिशय आनंद आहे की आपल्या पक्षाचा एक हाडाचा कार्यकर्ता, आज आपल्या पक्षाचा अध्यक्ष झाला. त्यांचे आई-वडील आमदार-खासदार नव्हते किंवा त्यांच्याकडे मोठा उद्योग व्यवसाय देखील नव्हता. खरं म्हणजे २००९ मध्ये मी जेव्हा भाजपचा महाराष्ट्र अध्यक्ष होतो, तेव्हा विधानसभा निवडणुकीत सगळ्यात शेवटी निर्णय झाला तो डोंबिवलीचा आणि हे तिकीट बऱ्याच वादाच्या भोवऱ्यात होतं. पण त्यावेळी मला विश्वास होता, की ज्या व्यक्तीला आपण तिकीट देणार आहोत, तो पुढे महाराष्ट्राचा भविष्यातील मोठा नेता होणार आहे आणि ते आज सिद्ध झालं.’’

 याचबरोबर ‘’खरं म्हणजे योगायोग असा आहे की, मी ज्यावेळी अध्यक्ष झालो आणि जेव्हा डोंबिवलीत गेलो होतो तेव्हा रवींद्र चव्हाण हे ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ऑटो रिक्षाबरोबर माझी मोठी रॅली काढली होती. आता ऑटोरिक्षाशी महाराष्ट्र भाजपचं काय नातं आहे, मला माहिती नाही. पण चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा भाजपने आणलं तेव्हा ते ऑटोरिक्षा चालक होते. म्हणजे ऑटोरिक्षा चालक ते ऑटोरिक्षा युनियनचा नेता असा हा दहा वर्षातील प्रवास आहे.’’ असं गडकरींना सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

याशिवाय, ‘’मला विशेषरूपाने आनंद आहे, की भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. ही कार्यकर्त्यांची पार्टी असल्याने सामान्य कार्यकर्ता ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली तो या पार्टीचा अध्यक्ष होवू शकतो, हे केवळ भाजपमध्ये होवू शकतं.’’ असं देखील नितीन गडकरी यांनी यावेळी आवर्जून सांगतिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : निम्न दूधनाचा पाणीसाठा ७० टक्क्यांवर

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर! वांद्र्यात मुलगा बुडाला, शोध घेण्याचे प्रयत्न सुरू, परिसरात भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT