मुंबई

आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार, अर्णब गोस्वामी यांना तूर्तास दिलासा नाही

- सुनीता महामुणकर

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. अटकेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायालयाने राज्य सरकारसह तक्रारदारांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले असून याप्रकरणात आता उद्या सुनावणी होणार आहे.

गोस्वामी यांना काल अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. अलिबाग न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याविरोधात त्यांनी याचिका केली असून कारवाई रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. न्या एस एस  शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर आज सुनावणी झाली. याचिकेत तक्रारदार अक्षता नाईक आणि राज्य सरकारची बाजू ऐकायला हवी, असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्यामुळे राज्य सरकारसह पोलिस आणि तक्रारदार नाईक यांना नोटीस बजावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. 

सन 2019 मध्ये पोलिसांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणाबाबत ए समरी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे प्रकरण बंद झाले असून त्याला पोलिस किंवा तक्रारदाराने आव्हान दिले नाही. तसेच कालची कारवाई न्यायालयाच्या परवानगीशिवाय पोलिसांनी  केली आहे, त्यामुळे ती अवैध आहे, हा व्यक्तींच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, असा युक्तिवाद गोस्वामी यांच्या वतीने करण्यात आला. सुनावणी होईपर्यंत जामीन मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली. मात्र, न्यायालयाने सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली असून सर्व पक्षकारांना बाजू मांडण्याचे निर्देश दिले.

( संपादन - सुमित बागुल )

no bail to arnab goswami mumbai high court adjourned case proceedings till tomorrow

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT