मुंबई

कोरोनामुळे आर्थिक ताण, तरीही रस्ते दुरुस्तीसाठी प्रयत्न योग्य; केडीएमसीचा खुलासा 

सुचिता करमरकर

कल्याण : कोरोना साथ रोगप्रतिबंधक उपाय योजनांमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेवर आर्थिक ताण आला आहे. मात्र त्यानंतरही पालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत रहावेत यासाठी प्रशासनाने योग्य दिशेने पावले टाकल्याचा खुलासा शहर अभियंता सपना कोळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. 

अभियंता कोळी यांनी माहिती देताना सांगितले की, 2020-21 या चालू वर्षासाठी महापालिकेमार्फत, महापालिकेतून वगळण्यात येणाऱ्या 18 गावांचा भाग वगळता 9 प्रशासकीय प्रभागातील रस्ते देखभाल दुरुस्तीची 15 कोटी 68 हजार रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ही कामे जूनअखेरिस सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यादेश देण्यात आले आहेत.

रस्तावरील खड्डे हे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणाने, पावसाळ्याच्या कालावधीत खडीकरणाने, काही प्रमाणात कोल्ड मिक्‍सने आणि पावसाळ्यानंतर पुन्हा डांबरीकरणाने भरण्यात येतात. सर्वच प्राधिकरणांमार्फत अशा प्रकारे कार्यवाही करण्यात येत असते. 

कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्र खाडी किनाऱ्याचा भाग असून येथे पावसाचे प्रमाण जास्त आहे. अतिवृष्टीदरम्यान सखल भागात पाणी साचून काही वेळा पूरपरिस्थिती निर्माण होऊन रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पावसाळ्याच्या कालावधीत डांबरीकरण केल्यास वरील परिस्थितीत ते टिकत नाही आणि नाहक खर्च होऊ शकतो.

अद्याप पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. त्यामुळे या कालावधीत डांबरीकरण करणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही. खडीकरणाने व काही प्रमाणात कोल्ड मिक्‍सने सर्वत्र खड्डे भरण्याची कामे सुरू आहेत. दाट रहदारीमुळे पाऊस उघडल्यावर खडी पसरते, तथापि ते साफ करून पुन्हा खडीकरण करून रोलिंग करण्यात येत असल्याचे कोळी यांनी सांगितले. 

भ्रष्टाचाराच्या आरोपांचे खंडन 
पालिका हद्दीत रस्ते दुरुस्तीसाठी डांबराचा वापर न करता खडी आणि मातीमध्ये खड्डे भरण्याची कामे सुरू असल्याचे तसेच या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप सध्या करण्यात येत आहे. या देखभाल दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाचे पालिकेने खंडन केले आहे. त्याचप्रमाणे या संदर्भातील कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले अद्याप दिली गेली नसल्याचेही पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील सर्व प्रभागात 10 ऑक्‍टोबरनंतर पावसाचा अंदाज घेऊन डांबरीकरणाने रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे नियोजन आहे.

--------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT