मुंबई

टोलनाक्‍यांवर अद्याप ‘फास्ट टॅग’च नाही 

सकाळ वृत्तसेवा


ठाणे : टोलनाक्‍यांवरील कोंडी फोडण्यासाठी देशातल्या सगळ्या राष्ट्रीय महामार्गांवर भरला जाणारा टोल हा १५ डिसेंबर २०१९ नंतर ‘फास्ट टॅग’द्वारे भरण्यात यावा, असा फतवा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) काढला असला, तरी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाक्‍यांवर या फास्ट टॅगचा अद्याप पत्ताच नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

ठाण्यातील आनंदनगर टोलनाक्‍यावरील व्यवस्थापन सांभाळणाऱ्या एमईपी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याविषयी विचारले असता, त्यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दर्शविला. तसेच, आधीच एमईपीचे मासिक पास वाहनधारकांनी घेतले असताना नव्या फास्ट टॅग प्रणालीमुळे नाहक डबल टोल वाहनधारकाच्या खिशातून जाईल, अशी भीतीही वर्तवली.
 ही बातमी वाचा ः हे सरकार मुर्ख, कसलाही विचार करत नाही

टोलनाक्‍यांवर लोकांची अडचण होऊ नये, म्हणून सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्‍यांच्या सगळ्या लेन्स या फास्ट टॅग लेन्स करण्याचे ठरवले आहे. इतर प्रकारांनी टोल भरायचा असेल, तर त्यासाठी दोन्ही बाजूंची प्रत्येकी एक लेन राखीव ठेवली जाईल. या लेनला ‘हायब्रिड लेन’ असे म्हटले जाते. देशातील सर्व टोलनाक्‍यांवर एनएचएआयने फास्ट टॅग लेन सक्तीची केली आहे. त्यानुसार, ठाण्यातील आनंदनगर टोलनाक्‍यावर एमईपीकडे पासधारकांसाठी यंत्रणा उपलब्ध असली, तरी फास्ट टॅगसाठी विशेष लेन अद्याप तरी उभारलेली दिसत नाही.


‘फास्ट टॅग’ म्हणजे काय?
‘फास्ट टॅग’चे डिजिटल स्टिकर प्रत्येक वाहनावर चिटकवले जाणार असून ते संबंधित वाहनधारकाच्या बॅंक खाते वा इतर खात्याशी लिंक असेल. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्‍नॉलॉजी तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते. या प्रक्रियेत संबंधित वाहन टोल नाक्‍यावरून जाताना तेथील कॅमेऱ्यातील सेंसरमधून स्वयंचलित पद्धतीने वाहनधारकाच्या खात्यातून कराची रक्कम कपात होईल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT