sanitation worker 
मुंबई

ना मास्क, ना हातमोजे; स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

सकाळवृत्तसेवा

कल्याण : पावसाळा तोंडावर आला असल्याने नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून, पालिकेने ही कामे करण्यासाठी खासगी ठेकेदारांची नेमणूक केली आहे. मात्र हे ठेकेदार कामगारांना अत्यावश्यक असलेले हातमोजे,  बूट,  मास्क आदि साहित्य न पुरवता काम करुन घेत असल्याचे समोर आले असून एकीकडे कोरोनाचे संकट असताना देखील सुरक्षा कवच न देता या कामगारांना कामाला लावल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सध्या लॉकडाऊन मधील चौथा टप्पा सुरू असताना देखील पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पालिकेने खासगी ठेकेदारांची नेमणूक करून कल्याण पूर्व सहित पालिका हद्दीत नालेसफाईला सुरुवात केली आहे. एकीकडे कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत असून दुसरीकडे नाले सफाई करणारे कामगार गटार नाल्यात उतरून कोणत्याही सुविधांविना गाळ आणि कचरा काढत असल्याचे भयानक चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यांना हे काम विनामोजे हाताने करावे लागत असून त्यांना कोणतेही सुरक्षाकवच देखील ठेकेदाराकडून देण्यात आलेले नाही.

भाजपकडून आयुक्तांकडे तक्रार 
कोट्यवधी रुपयांचा फायदा खिशात घालणाऱ्या ठेकेदाराकडून कामगारांना सुरक्षेची कोणतीही साधने अथवा सुरक्षा कवच देखील पुरवले जात नसल्याचा आरोप भाजपा कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष आणि परिवहन सदस्य संजय मोरे यांनी केला आहे. दरम्यान पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लक्ष्य देऊन कामगारांना सुरक्षा कवच द्यावे अन्यथा ठेकेदारांची बिले रोखावी अशी मागणी मोरे यांनी केली आहे.

No masks, no gloves; Endangering the health of sanitation workers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT