no permission for digging on new CC road bmc road construction mumbai sakal
मुंबई

Mumbai News : नव्या सीसी रोडवर खोदकामासाठी परवानगी नाहीच!

पालिका अतिरिक्त आयुक्तांचे यंत्रणेला परिपत्रक जारी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून सिमेंट कॉंक्रिट (सीसी) रोडच्या कामासाठी निविदा प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे. मुंबईत खड्डेमुक्तीसाठी सीसी रोडचा पॅटर्न महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आला आहे. महानगरपालिकेकडून सीसी रोडसाठी खोदकामाच्या परवानगीबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. अतिशय अपरिहार्य कारण असल्यावरच ही परवानगी देण्यात येईल असेही परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे. सीसी रोडच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना तसेच अभियंत्यांना स्पष्ट सूचना देणारे परिपत्रकच जारी केले आहे. त्यानुसार पर्यायी व्यवस्थेच्या शोधाशिवाय कुणीही खोदकामासाठीच्या प्रस्तावाची फाईल सादर करू नये असेही बजावण्यात आले आहे.

अनेक नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्यांच्या ठिकाणी अनेक वॉर्ड तसेच विविध यंत्रणांच्या माध्यमातून खोदकामासाठी परवानगी मागणारे अर्ज येत असल्याचे पालिकेने म्हटले आहे. डिफेक्ट लायेबिलिटी पिरियड (डीएलपी) च्या आधीच अनेक ठिकाणी खोदकामासाठी परवानगी मिळावी म्हणून अर्ज आल्याचेही त्यांनी नमुद केले आहे. त्यामुळेच नव्याने बांधण्यात आलेल्या सीसी रोडच्या ठिकाणी कोणतीही परवानगी यापुढे देण्यात येणार नाही असे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे. तसेच टाळण्यासारखी परिस्थिती नसेल अशा वेळीच ही परवानगी देण्यात येईल असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विविध यंत्रणांच्या दुरूस्तीच्या आणि देखभालीच्या कामाच्या बाबतीतही नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्याच्या खालोखालच यंत्रणांचे जाळे असावे. त्यामुळे नव्या रस्त्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये, असेही परिपत्रकाच्या माध्यमातून वेलरासू यांनी सर्व अभियंत्यांना स्पष्ट केले आहे. सर्व सहाय्यक आयुक्तांनी ही माहिती आपल्या यंत्रणेत द्यावी असेही त्यांनी म्हटले आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या सीसी रोडच्या ठिकाणी खोदकामाला परवानगी मागणे हेच मुळात सवाल उपस्थित करणारे असल्याचे वेलरासू यांनी म्हटले आहे.

मुंबईत महानगरपालिकनेने ४२० किलोमीटरच्या सीसी रोडचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी पालिका जवळपास ७ हजार कोटी रूपयांची भांडवली गुंतवणुक करणार आहे. पालिकेने अतिशय कडक अटी व शर्थी यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर पालिकेकडून याआधीही बांधण्यात आलेल्या सीसी रोडच्या कामांची पूर्तता पालिकेने केली आहे. परंतु याठिकाणी खोदकामासाठीच्या विनंत्यांमुळे पालिकेने या कामासाठी लाल कंदील दाखवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT