dilip walse patil Sakal Media
मुंबई

समीर वानखेडेंवर पोलिसांचा वॉच नाहीय - गृहमंत्री

पोलिसांची आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

रश्मी पुराणिक

मुंबई: मुंबईत आज पोलीस (Police) अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil)यांनी माहिती दिली आहे. "राज्यामध्ये वाढणारी गुन्हेगारी, महिलांवर होणारे अत्याचार या संदर्भात निर्णय घेण्याच्या दृष्टीकोनातून सगळे पोलीस अधीक्षक, आयुक्तांना बोलावले आहे. दुपारी दोनला बैठक सुरु होईल. पाच वाजेपर्यंत चालेल परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन सूचना देण्यात येतील" अशी माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

गडचिरोलीत एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि रश्मी शुक्ला एका मंचावर उपस्थित होते. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर माहिती नसल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. समीर वानखेडेंनी त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली आहे. त्या बद्दल विचारलेल्या प्रश्नावर वळसे-पाटील म्हणाले की, "मला काही तसं वाटत नाही. समीर वानखेडेंवर पोलिसांच वॉच नाहीय. तशा सूचना दिलेल्या नाहीत"

सुबोध जैस्वाल यांना पाठवलेल्या समन्सबद्दलच्या प्रश्नालाही गृहमंत्र्यांनी उत्तर दिले. "सीबीआय डायरेक्टर म्हणून समनस बजावलेले नाही. साक्षीदार म्हणून ते समन्स बजावलं आहे. रश्मी शुक्ला प्रकरणात चौकशी सुरु आहे. त्यावेळी ते डीजी होते" असे वळसे-पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: कोट्यवधींची जमीन, आलिशान बंगला, फार्महाऊस… अशोक खरात १५ वर्षांत कसा बनला २०० कोटींचा मालक? कुंडली आली समोर

Bank Holiday: उद्या बँकांना सुट्टी? ईदमुळे 21 मार्चला तुमच्या शहरात बँका बंद की सुरू? पाहा RBI ची माहिती

'आमच्याकडे ‘जिन’ आहे, तो सर्व इच्छा पूर्ण करतो' म्हणत तरुणीची फसवणूक, अडीच वर्षांत १६ लाख रुपयांनी घातला गंडा

'ये तू इथून जा रे...' मराठी अभिनेत्यावर चांगलेच भडकलेले अशोकमामा आणि सचिन पिळगावकर, म्हणालेले...'याला इकडून हाकला रे…'

Maharashtra Kesari: उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट; माती-गादी विभागात अंतिम फेरीसाठी मल्ल सज्ज

SCROLL FOR NEXT