panipurawatha.jpg
panipurawatha.jpg 
मुंबई

‘माझे कुटुंब..’ मोहिमेला प्रतिसाद न दिल्याने कारवाई; भाईंदरमधील सोसायटीचे नळ-कनेक्‍शन तोडले  

संदीप पंडित

भाईंदर ः कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य रोगास प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणास सहकार्य न केल्याच्या नावाखाली प्लेझंट पार्क येथील श्रीकृष्ण लीला या गृहनिर्माण सोसायाटीचे नळ-कनेक्‍शन गुरुवारी (ता. ८) तोडण्यात आले. या प्रकरणात प्रभाग अधिकाऱ्याला नळ-कनेक्‍शन तोडण्याचे आदेश नसतानाही त्याने ही कारवाई केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे; तर महापौरांनी अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या सोसायटीमध्ये ४८ प्लॅट आणि १६ दुकाने आहेत. 


दरम्यान पालिका हद्दीत पाण्याची कमतरता असून जवळपास दोन दोन दिवसांनी पाणी येत असते पाण्याचे कनेक्शन तोडल्याने इमारती मधील लोकांना खूप त्रास झाला आज संध्याकाळी स्थानिक नगरसेविका सुरेखा सोनार यांनी पालिका कर्मचाऱ्यांना बोलावून तोडलेले पाण्याचे कनेक्शन पुन्हा लावून घेतले .
  मिरा भाईंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत सर्व गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन तपासणी करण्यात येत आहे. प्लेझंट पार्क येथील श्रीकृष्ण लीला या सोसायटीतील नागरिकांनी या मोहिमेला कडाडून विरोध केला असता प्रभाग क्र. ६ चे प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांनी या सोसायटीचे नळ-कनेक्‍शन तोडले आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
 महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले यांनी यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, ज्या गृहनिर्माण संस्था सदर सर्वेक्षणासाठी वैद्यकीय विभागाच्या पथकाला सोसायटीत प्रवेश नाकारतील किंवा सहकार्य करणार नाही, अशा सर्व गृहनिर्माण संस्थांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनिमय २००५ मधील ५१ (ब), भारतीय साथरोग अधिनियम १८९७ व भारतीय दंडसंहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनीय व कायदेशीर कारवाई सोसायटीविरोधात करण्यात येईल. महानगरपालिकेने दिलेली धमकी अन्यायकारक असल्याने प्रशासनाने हा आदेश तत्काळ रद्द करावा, अशी मागणीही दळवी यांनी केली आहे.

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कोणतीही माहिती न देता ते दुपारी अचानक तपासणीसाठी आले. त्या वेळी सोसायटीमधील पुरुष कामावर होते. त्यामुळे टिपणीसाठी खाली कोण येऊ शकले नाही. आम्ही अधिकाऱ्यांना एक दिवसाची मुदत द्या, आम्ही सर्वांना तपासणीसाठी बोलावतो, असे सांगितले; पण त्यांनी काहीही ऐकून न घेता पाण्याचे कनेक्‍शन कापले. 
- विद्याधर जैस्वाल, सेक्रेटरी श्रीकृष्ण लीला सोसायटी

शहरातील नागरिकांना विश्वासात घेऊन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जाणे आवश्‍यक असताना एखादा अधिकारी कोणतेही आदेश नसताना पाण्याचे कनेक्‍शन कसे तोडू शकतो. अगोदरच लोक कोरोनाने हैराण झाले असताना त्यांना अशा प्रकारे वेठीस धरणे चुकीचे आहे. त्यामुळे या प्रभाग अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश मी आयुक्तांना दिले आहेत. 
-  ज्योत्स्ना हसनाले, महापौर, मिरा भाईंदर 
 

No response to the ‘My Family ..’ campaign Giving disconnected the tap-connection of the Society in Bhayander

(  संपादन ः रोशन मोरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT