मुंबई

नाट्य व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी; नाट्यप्रयोगाचे सामान ने-आण करणाऱ्या वाहनांचा टोल माफ

संतोष भिंगार्डे

मुंबई : राज्य सरकारने चित्रपटगृहे तसेच नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी अजूनही म्हणावी तशी चित्रपटगृहे उघडलेली नाहीत. नाट्यगृहांची देखील तीच स्थिती आहे. परंतु आता मराठी रंगभूमीसाठी एक आनंदाची  बातमी समोर आली आहे. मुंबईबाहेरील नाट्यप्रयोगाचे सामान ने-आण करणारी टेम्पो आणि बस यांचा टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

मुंबईबाहेर नाटकांचे प्रयोग करायचे असल्यास नाटकांचे सामान ने-आण करणाऱ्या वाहनांना मोठा टोल भरावा लागत होता. त्यामुळे मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने हा टोल माफ करण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मुंबई बाहेरील नाटकांचे सामान ने - आण करणाऱ्या वाहनांचा टोल माफ केला आहे.

याबाबत मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर म्हणाले की, "कोरोनाच्या काळात सरकारने नाट्यसृ्ष्टीसाठी हा खूप चांगला निर्णय घेतला आहे. कारण आम्हाला ठाणे किंवा पुणे तसेच अन्य ठिकाणी नाटकांचे प्रयोग करायचे झाल्यास बस आणि टेम्पो यांना खूप टोल भरावा लागत होता. आता तो माफ करण्यात आला आहे. याबाबत मी सरकारचा आभारी आहे."

( संपादन - सुमित बागुल )

no toll to vehicle transporting theater equipment and material big relief to producers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : मयूर रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक; रंगीबेरंगी फुलांनी सजला रथ; सकाळी ८ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT