कळवा : मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानकातून मुंबई, कल्याण, डोंबिवली व अन्य शहरांत मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग जातो. या स्थानकातून सुमारे दीड ते दोन लाख प्रवाशांची वर्दळ असते. सकाळच्या वेळी कळवा स्थानकात कर्जत- कसारा- कल्याण- डोंबिवली या मार्गांवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आधीच गर्दीने खच्चून भरलेल्या असतात. त्यामुळे कळव्यातील प्रवाशांना या लोकलमध्ये चढता येत नाही.
कळवा येथे कारशेड असताना तेथूनही मुंबईसाठी लोकल रवाना होतात; मात्र या लोकलना थांबा नसल्याने एकही लोकल आमच्या कामाची नाही, अशीच भावना प्रवासी व्यक्त करत आहेत. कळवा स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी वारंवार करतात; मात्र रेल्वे प्रशासन या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याने प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.
कळवा परिसराची लोकसंख्या जवळपास पाच ते सहा लाखांच्या घरात गेली आहे. मुंबई-ठाण्यात प्रचंड प्रमाणात नागरीकरण झाल्याने मध्यमवर्गीयांनी कळवा-खारीगावात आपले बस्तान बसवले. त्यामुळे मुंबईत नोकरी-व्यवसायासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा भार सध्या कळवा रेल्वे स्थानकावर पडत असल्याने प्रवाशांचे "शेड्युल' बदलताना दिसत आहे.
कळवा रेल्वे स्थानकात मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गच्च भरून येत असल्याने कळव्यातील प्रवाशांना चढता येत नाही. दरवाजात लटकल्याने गर्दीच्या रेट्याने अनेक जण लोकलमधून पडून मृत वा जखमी झाले आहेत. त्यामुळे या गर्दीतून सुटका करण्यासाठी कळवा रेल्वे स्थानकातून सीएसएमटी अशी लोकल सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे.
कळवा स्थानकात येणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांना गर्दीमुळे चढता येत नाही. सकाळी कळवा कारशेडमधून लोकल सोडाव्यात, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
- विजय देसाई, सचिव,
रेल्वे प्रवासी संघटना, कळवा.
सकाळी कळवा स्थानकात प्रचंड गर्दी असते. त्यामुळे लोकलमध्ये चढायला मिळत नाही. या गर्दीच्या रेट्यातून वाचण्यासाठी आम्ही कारशेडमधील लोकलचा जीव धोक्यात घालून उपयोग करतो.
- संतोष मोरे, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.