Dasara Melava sakal
मुंबई

Dasra Melava: दसरा मेळावा पार्श्वूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी !

सकाळ डिजिटल टीम

Dasra Melava: शिवाजी पार्क परिसरात २४ ऑक्टोबरला होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी मुंबई पोलिसांनी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या वाहनांसह उपस्थित राहणार आहेत. परिणामी पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्ग आणि समारंभाच्या ठिकाणी जाणाऱ्या जवळपासच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे. त्याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.

वाहतूक पोलिस उपआयुक्त (मुख्यालय आणि मध्य) डॉ. राजू भुजबळ यांनी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार एस. व्ही. एस. रोड (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँकेपर्यंत), दादरमधील केळुस्कर रोड (दक्षिण) आणि (उत्तर), एम. बी. राऊत रोड (एस. व्ही. एस. रोडच्या जंक्शनपासून), दादर पांडुरंग नाईक मार्ग (एम. बी. राऊत रोड), दादासाहेब रेगे मार्ग (सेनापती बापट पुतळ्यापासून गडकरी जंक्शनपर्यंत), लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग (शिवाजी पार्क गेट क्रमांक चार ते शीतलादेवी मंदिर जंक्शनपर्यंत), एन. सी. केळकर मार्ग (गडकरी जंक्शन ते हनुमान मंदिर जंक्शनपर्यंत) आणि एल. जे. रोड, राजाबाडे जंक्शन ते गडकरी जंक्शनपर्यंत नो पार्किंग असेल.

बाल गोविंदास मार्ग पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शनपासून सेनापती बापट मार्ग पासून एल. जे. मार्ग पश्चिमेकडे वाहतूक बंद असेल. मनोरमा नगरकर मार्गाकडे वाहतूक वळवली जाईल. सेनापती बापट पुतळा ते गडकरी जंक्शनपर्यंत दादासाहेब रेगे रोडकडे वाहतूक बंद. वाहतूक एल. जे. रोड, गोखले रोड आणि रानडे रोडकडे वळवण्यात येईल.

नो एंट्री आणि पर्यायी मार्ग

- एस. व्ही. एस. रोड सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन माहीमपर्यंत. (पर्यायी मार्ग : सिद्धिविनायक जंक्शन-एस. के. बोले रोड-आगर बाजार-पोर्तुगीज चर्च आणि गोखले रोड).

- राजा बढे चौक जंक्शनपासून केळुस्कर मार्ग (उत्तर) जंक्शन दादरपर्यंत नो एंट्री. (पर्यायी मार्ग : एल. जे. रोड-गोखले रोड-स्टील मॅन जंक्शननंतर गोखले रोडने पुढे जाता येईल).

- दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पांडुरंग नाईक मार्गावरील जंक्शनपासून लेफ्टनंट दिलीप गुप्ते रोड. (पर्यायी मार्ग : राजा बढे जंक्शनमार्गे एल. जे. रोडकडे जाता येईल.)

- गडकरी चौक जंक्शन ते केळुस्कर रोड (दक्षिण) दादर पर्यंत. (पर्यायी मार्ग : एम. बी. राऊत मार्ग).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT