File Photo 
मुंबई

आता ब्रेथ ऍनालायझर चाचणीही बंद...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशभरात प्रादुर्भाव झालेला कोरोना हा विषाणूजन्य आजार सांसर्गिक असल्यामुळे मद्यपी वाहनचालकांची ब्रेथ ऍनालायझर चाचणी बंद करण्यात आली आहे. ब्रेथ ऍनालायझरमुळे संसर्ग होण्याची शक्‍यता असल्याने हा निर्णय घेतल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी खासगी कंपन्यांना 50 टक्के मनुष्यबळावर कामकाज चालवण्याचा आदेश दिला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बाधा झालेले रुग्ण ठेवलेल्या रुग्णालयांच्या परिसरातील वाहतूक बंद करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. नागरिकांनी एकत्र जमू नये म्हणून शाळा-महाविद्यालये, जलतरण तलाव, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद ठेवण्यात आली आहेत.

वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस ठिकठिकाणी नाकाबंदी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतात. मद्यपान केलेल्या वाहनचालकांना पकडण्यासाठी ब्रेथ ऍनालायझर उपकरणाने चाचणी केली जाते. या उपकरणाच्या वापरामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्‍यता असून, पोलिसांनाही बाधा होऊ शकते. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वाहतूक चौक्‍यांना काही दिवस ब्रेथ ऍनालायझर चाचणी बंद करण्याचा आदेश दिला आहे.

Now Breath Analyzer Test stoped... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment : लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? दिवाळीपूर्वी खात्यात 3,000 रुपये जमा होणार का? जाणून घ्या मोठी अपडेट

IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला पाचवा सामना होणार रद्द? चिंता वाढवणारे अपडेट्स, मालिका बरोबरीत सुटणार?

अजब प्रेमाची गजब कहाणी! प्रसिद्ध ३० वर्षीय इन्फ्लुएन्सर लग्नबंधनात अडकणार, थेट ७५ वर्षीय व्यक्तीसोबत साखरपुडा पार

Navratri Day Six: आज नवरात्रीची सहावी माळ! देवी कात्यायनीची पूजा कशी करावी? जाणून घ्या मंत्र, नैवेद्य आणि पौराणिक कथा

Supreme Court: सुनावणी सुरु असताना CJI सूर्यकांत यांच्यासमोरच न्यायालयात राडा! वकिलाचा मायक्रोफोन हिसकावला, चालू प्रकरणातून वकिलाची माघार

SCROLL FOR NEXT