aayush kadha 
मुंबई

मुंबईत आता कोविड रूग्णांना देण्यात येणार 'ही' औषधं; आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या औषधांनी होणार उपचार.. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना आता संशमनी वटी, आयुष काढा, च्यवनप्राश अश्या प्रकारची औषध देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही कोविड रुग्णांना आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या या औषधांचा उपचार करून निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. या औषधांमुळे कोविड रुग्णांमधील लक्षणे कमी होण्यास मदत मिळेल असे सांगण्यात येते.

आयुष मंत्रालयाने कोविड रुग्णांसाठी काही औषधं सुचवली आहेत.  रुग्णांवर आता आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या औषधांने देखील उपचार होणार आहे.  महाराष्ट्र शासनाच्या आयुष टास्क फोर्सच्या टीमने बिकेसी येथील कोविड सेंटरला प्रथमच भेट देत आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या नियमावलीनुसार मोफत औषधांचे वाटप सुरू केले.

मुंबईत अनेक ठिकाणी कोविड रुग्णालये तसेच सेंटर उभारण्यात आले आहेत.  त्यातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना आयुषची ही औषधे देण्याचा निर्णय झाला आहे. सध्या बिकेसीतील कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची निवड करण्यात आली आहे. बिकेसीतील कोविड रुग्णालयात 500  रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्यातील 200 सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना व येथे काम करणाऱ्या डॉक्टरांना आज पासून ही औषधे वाटप करण्यात येणार आहे. यात संशमनी वटी, आयुष काढा, च्यवनप्राश यांचा समावेश असून ही औषध धुतपापेश्वर कंपनी मार्फत मोफत डॉ. शुभा राऊळ यांनी उपलब्ध केली. 

 आयुष कोविड टास्क फोर्स मोफत औषध वाटप करण्याचे काम करत आहे. या औषधांमुळे कोविड रुग्णांची लक्षण कमी होण्यास मदत मिळेल. ही तिन्ही औषधं एकत्रित पणे काम करणार आहे आणि रुग्णांना पूर्णपणे बर होण्यास मदत करतील असा विश्वास आयुष टास्क फोर्सच्या सदस्य डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केला.  

आयुषच्या या औषधांबाबत सकारात्मक असल्याचे महिला अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आजपासून कोविड रुग्णांवर हे प्रथमोपचार करण्यात येत आहेत. याची जबाबदारी कोविड रुग्णालयात नेमण्यात आलेल्या आयुर्वेदिक डॉक्टरांना देण्यात आली आहे.

15 दिवसांनी हे औषध दिलेल्या व न दिलेल्या रुग्णांचा निरीक्षण केले जाईल असे बिकेसी येथील कोविड रुग्णालयाचे डिन डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले. रुग्णांना या औषधांमुळे लाभ झाल्यास इतर रुग्णांना ही औषधं पुरवण्यात येणार आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT